मेनच्या बाजूला घ्यावी
---
NSK26H30049
जळगाव : विसर्जन मार्गावरील खड्ड्यांची पाहणी करताना महापौर दीपमाला काळे.
---
विसर्जन मार्गावरील खड्डे
दोन दिवसांत बुजवा
महापौरांकडून पाहणी; केबल्स हटविण्याच्या सूचना
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १९ : गणेश विसर्जन मिरवणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना शहरातील प्रमुख विसर्जन मार्गाच्या स्थितीचा महापौर दीपमाला काळे यांनी शनिवारी (ता. १९) प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. शिवतीर्थ चौक ते टॉवर चौक या मार्गावर ठिकठिकाणी आढळलेले खड्डे, खराब साईडपट्ट्या, लोंबकळणाऱ्या केबल्स आणि रस्त्यालगतची अस्वच्छता पाहून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
शहरातील खड्डे आणि इतर नागरी समस्यांबाबत नागरिकांकडून तक्रारी वाढल्यानंतर महापौरांनी हा पाहणी दौरा केला. यावेळी भाजपचे गटनेते प्रकाश बालाणी, स्थायी समिती सदस्य अरविंद देशमुख, शिवसेना (ठाकरे गट) प्रतिनिधी शोएब खाटीक, आर. टी. पाटील, योगेश रंधे, संजय ठाकूर आदी उपस्थित होते.
चौकट
रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई
विसर्जन मिरवणुकीत नागरिकांची मोठी गर्दी होणार असल्याने मार्गावरील अडथळे पुढील दोन दिवसांत दूर करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. नेहरू चौकात एका हॉकर्सकडून रस्त्यावरच कचरा व अस्वच्छता केली जात असल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले. यावर महापौरांनी संबंधित हॉकर्सवर दंडात्मक कारवाई करून वाहन जप्त करण्याचे निर्देश दिले. तसेच टॉवर चौकातील सुरू असलेल्या डांबरीकरणाच्या कामाचीही महापौरांनी पाहणी केली.