आध्यात्मिक प्रवचने, महाअभिषेक, महाप्रसादाने परिसर भक्तिमय

आध्यात्मिक प्रवचने, महाअभिषेक, महाप्रसादाने परिसर भक्तिमय
Published on
फोटो : H30051 इस्कॉन नाशिक मंदिरात ''श्री राधाष्टमी'' सोहळा आध्यात्मिक प्रवचने, महाअभिषेक, महाप्रसादाने परिसर भक्तिमय सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १९ : इस्कॉन श्री श्री राधा मदन गोपाल मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर येणारा ''श्री राधाष्टमी'' हा पावन उत्सव वर्षातील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अलौकिक सोहळा शनिवारी (ता.१९) साजरा करण्यात आला. महोत्सवाचा प्रारंभ पहाटे ५ वाजता अतिशय मंगलमय वातावरणात मंगल आरतीने झाला. यानंतर भाविकांनी हरे कृष्ण महामंत्राचा विधिवत नामजप केला. त्यानंतर नयनरम्य दर्शन आरती आणि भावमधुर कीर्तनाचा गजर झाला. यंदाच्या सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या प्रवक्त्या नीताई सेविनी माताजी यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी प्रवचनातून जीवात्म्याचे परम उद्दिष्ट भगवद्धामी परतणे हे आहे. त्यासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे भगवंताचे स्मरण करणे होय. राधाराणी भगवंतांची आल्हादिनी शक्ती आहेत आणि त्या भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची सेवा करतात व भक्तांच्या भक्तीचे पोषणही करतात, असा संदेश दिला. त्यांच्या ओघवत्या आणि सुमधुर वाणीतील प्रवचनाने उपस्थित हजारो नाशिककर भाविकांना मंत्रमुग्ध केले. दिवसभरात राधाराणींच्या स्तुतीसाठी विशेष राधिकाष्टकम स्तवनाचे सस्वर गायन करण्यात आले. राधाराणींचे रूप डोळ्यांत साठवण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात प्रचंड गर्दी केली होती. सायंकाळी उत्सव विग्रहांचा दूध, दही, तूप, मध, साखरेच्या पंचामृतासह विविध दुर्मिळ फळांच्या रसांनी भव्य महाअभिषेक पार पडला. अभिषेकानंतर भगवंतांना तब्बल १०८ पेक्षा जास्त विविध पक्वान्नांचा व पदार्थांचा महाभोग अर्पण करण्यात आला आणि त्यानंतर महाआरती झाली. आज कथासत्र रविवारी (ता.२०) सकाळी नीताई सेविनी माताजींद्वारे विशेष श्रीमद्भागवतम् कथेचे सत्र पार पडणार आहे. तसेच, १६ ते ३० वयोगटातील युवतींसाठी इस्कॉन यूथ सर्व्हिसतर्फे दुपारी १२ वाजता नीताई सेविनी माताजींच्या विशेष मार्गदर्शनाखाली ''चेतना फेस्ट २०२६'' होईल. यानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com