एसएमबीटी मान्यताप्राप्त हॉस्पिटल

एसएमबीटी मान्यताप्राप्त हॉस्पिटल
Published on
पोलिसांसाठी एसएमबीटीत कॅशलेस उपचार ५० हून अधिक गंभीर व आपत्कालीन आजारांचा समावेश सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १९ : महाराष्ट्र पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी एसएमबीटी हॉस्पिटल आणि ‘महाराष्ट्र पोलिस कुटुंब आरोग्य योजना’ (एमपीकेएवाय) यांच्यात विशेष करार करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना विविध गंभीर आजारांवर कॅशलेस उपचार मिळणार आहेत. या योजनेत अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया, हृदयाच्या झडपांची दुरुस्ती व बदल, कर्करोगावरील उपचार, मूत्रपिंड व अस्थिमज्जा प्रत्यारोपण यांसह ५० हून अधिक गंभीर व आपत्कालीन उपचारांचा समावेश आहे. रस्ता अपघात, पक्षाघात, तीव्र मेंदूविकार, जळीत, विषबाधा तसेच कान-नाक-घसा, स्त्रीरोग, प्रसूती आणि बालरोगाशी संबंधित आपत्कालीन उपचारही योजनेत समाविष्ट आहेत. एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये २६ पेक्षा अधिक विशेष व अतिविशेष वैद्यकीय विभाग, अत्याधुनिक अतिदक्षता विभाग, १७ मॉड्युलर शस्त्रक्रिया कक्ष, कॅथलॅब, सीटी स्कॅन, एमआरआय, डिजिटल एक्स-रे, रक्तपेढी आणि २४ तास आपत्कालीन विभाग उपलब्ध आहेत. चौकट पोलिस कुटुंबीयांसाठी हेल्पलाइन कॅशलेस उपचार व मार्गदर्शनासाठी ८६०५१ ७०१७० या क्रमांकावर २४ तास संपर्क साधता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com