श्रद्धा मॉल येथे टाटा झुडिओच्या विस्तारीत भव्य स्टोअरचे उद्घाटन

श्रद्धा मॉल येथे टाटा झुडिओच्या विस्तारीत भव्य स्टोअरचे उद्घाटन
Published on
NSK26H30055 कॉलेज रोड : येथील श्रद्धा मॉलमध्ये ‘झुडिओ’ च्या दालनाचे उद्‌घाटन करताना महापौर हिमगौरी आहेर आडके. शेजारी उपमहापौर विलास शिंदे, नाशिक पश्चिम प्रभाग सभापती सुरेश पाटील, अभिजीत आडके व श्रद्धा मॉलचे व्यवस्थापकीय संचालक कृणाल पाटील. श्रद्धा मॉलमध्ये झुडिओचे विस्तारित दालन ग्राहकांच्या सेवेत नाशिक, ता. १९ : कॉलेज रोड येथील श्रद्धा मॉलमध्ये टाटा समूहाच्या झुडिओ या लोकप्रिय फॅशन ब्रँडच्या नव्या व विस्तारित दालनाचे आज गणेशोत्सवाच्या पर्वात उद्घाटन झाले. पूर्वी तळमजल्यावर असलेले झुडिओचे दालन आता पहिल्या मजल्यावर सुमारे १४ हजार चौरस फुटांच्या प्रशस्त जागेत नव्या स्वरूपात सुरू झाले आहे. महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे, नाशिक पश्चिम प्रभाग सभापती सुरेश पाटील, अभिजीत आडके आणि श्रद्धा मॉलचे व्यवस्थापकीय संचालक कृणाल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी हिमगौरी आहेर आडके यांनी, ‘मोठ्या जागेत आणि विविध प्रकारच्या वस्तूंसह सुरू झालेले हे दालन कॉलेज रोड परिसरातील नागरिकांसाठी चांगला पर्याय ठरेल. ग्राहकांना अधिक चांगला खरेदी अनुभव मिळेल,’ असे सांगितले. नव्या दालनात कपडे व जीवनशैलीशी संबंधित विविध वस्तूंची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे. या प्रसंगी झुडिओच्या प्रकल्प व व्यवस्थापन पथकासह कर्मचारी उपस्थित होते. विशेष उल्लेखनीय म्हणजे दिव्यांग कर्मचाऱ्यांनी मान्यवरांचा सत्कार करून कार्यक्रमात सहभाग घेतला. श्रद्धा मॉलचे व्यवस्थापकीय संचालक कृणाल पाटील यांनी नव्या दालनामुळे ग्राहकांना अधिक व्यापक पर्याय उपलब्ध झाल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com