जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत नंदुरबार तालुक्याची दमदार कामगिरी

जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत नंदुरबार तालुक्याची दमदार कामगिरी
Published on
NSK26H30054 नंदुरबार : कुस्ती स्पर्धेचा प्रारंभ करताना तालुका क्रीडाधिकारी ओंकार जाधव, संजय बेलोरकर, मीनल वळवी, अजित लांडगे, संदीप पाटील, जगदीश वंजारी, बंटी चौधरी आदी. --- जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत नंदुरबार तालुक्याची कामगिरी विविध वयोगटांतील विजेते राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र नंदुरबार, ता. २० : क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आणि नंदुरबार जिल्हा कुस्ती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत नंदुरबार तालुक्याच्या खेळाडूंनी विविध वयोगटांत उल्लेखनीय यश मिळविले. स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांतील कुस्तीपटूंनी ताकद, डावपेच आणि चपळाईच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजेतेपद पटकावले. विजेत्यांमध्ये श्रॉफ हायस्कूलची पलक बुवा, शिवराज बुवा व अमित भिल, यशवंत विद्यालयाचा अर्पित तिलंगे, कमला नेहरू कन्या विद्यालयाची ईश्वरी बागूल, लोकमत विद्यालयाचा हेमराज कोळी, एकलव्य विद्यालयाचा रोहित गुरव, राजे शिवाजी विद्यालयाचे कृष्णा चौधरी व गोपाल वळवी, सोनगीरपाडा आश्रमशाळेचे गृहेश पाटील व शनिराज पाटील, अँग्लो उर्दू हायस्कूलचा कुरेशी मुजाहिद, तसेच डी. आर. हायस्कूलचा हिमांशू संजय पानपाटील यांचा समावेश आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठी तालुका क्रीडाधिकारी ओंकार जाधव, संजय बेलोरकर, तालुका संयोजक मीनल वळवी, प्रशिक्षक अजित लांडगे, संदीप पाटील, जगदीश वंजारी, बंटी चौधरी, दादाभाई बुवा, नितीन कबाडे व तैसिफ शेख यांचे सहकार्य लाभले. पंच म्हणून निखिल मराठी, बंटी चौधरी व बी. बी. पाटील यांनी काम पाहिले, तर गुणलेखक म्हणून मनीष सनेर व महेश भट यांनी जबाबदारी सांभाळली. स्पर्धेतील सर्व विजयी खेळाडू आता जिल्ह्याचे प्रतिनिधित्व पुढील स्तरावरील स्पर्धेत करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com