सामाजिक, ज्वलंत विषयांवरील आरास लक्षवेधी

सामाजिक, ज्वलंत विषयांवरील आरास लक्षवेधी
Published on
टुडे एक मेन फिचर --- NSK26H30037 जळगाव : शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांची आरास व आकर्षक गणेशमूर्ती पाहण्यासाठी नवीपेठेत भाविकांची झालेली गर्दी. -------------- NSK26H30038 नेहरु चौक मित्रमंडळाची आरास पाहण्यासाठी महिलांनी लावलेल्या रांगा. ------------- NSK26H30039 श्रीमंत शिवा गणेश मंडळाची आकर्षक गणेशमूर्ती. सामाजिक, ज्वलंत विषयांवरील आरास लक्षवेधी गणेशदर्शनासह देखावे पाहण्यासाठी जळगावकरांची मोठी गर्दी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १९ : गणेशोत्सवानिमित्त जळगाव शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी यंदा सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक तसेच ज्वलंत विषयांवर आधारित आकर्षक देखावे आणि भव्य आरास साकारल्या आहेत. गणेशमूर्तींच्या दर्शनासोबतच हे देखावे पाहण्यासाठी शहरातील विविध भागांत भाविकांची मोठी गर्दी होत आहे. नवी पेठ, सुभाष चौक, स्टेशन रोड, नेहरू चौक, चित्रा चौक आणि मुख्य बाजारपेठेतील गणेश मंडळांच्या आरास विशेष आकर्षण ठरत आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात मंडळांनी सामाजिक संदेश देणाऱ्या विषयांना विशेष प्राधान्य दिले आहे. पर्यावरण संवर्धन, ऐतिहासिक घटना, पौराणिक प्रसंग, विविध मंदिरांच्या प्रतिकृती तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित देखावे साकारण्यात आले आहेत. आकर्षक विद्युत रोषणाई, ध्वनी व्यवस्था आणि कलात्मक सजावटीमुळे रात्रीच्या वेळी या देखाव्यांचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे. सायंकाळनंतर गणेश मंडळांसमोर भाविकांच्या रांगा लागत असून, रात्री उशिरापर्यंत नागरिकांचा दर्शनासाठी ओघ सुरू आहे. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच कुटुंबांसह नागरिक मोठ्या उत्साहाने गणेशदर्शन व देखावे पाहण्यासाठी बाहेर पडत आहेत. वाढती गर्दी लक्षात घेता पोलिस प्रशासन, स्वयंसेवक आणि विविध सामाजिक संस्थांकडून वाहतूक नियंत्रण व गर्दी व्यवस्थापनाची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, पावसामुळे धावपळ होऊ नये म्हणून काही मंडळांच्या कार्यकर्त्यांची तातडीच्या उपाययोजना केल्या आहेत. चौकट ‘विकेंड’मुळे आजही उसळणार गर्दी भव्य आरास आणि देखावे साकारण्यासाठी मंडळांचे कार्यकर्ते, कलाकार व कारागीर गेल्या अनेक दिवसांपासून परिश्रम घेत आहेत. बांबू, थर्माकोल, कापड, रंग, आकर्षक विद्युत रोषणाई तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देखावे उभारण्यात आले आहेत. अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर साकारलेल्या या देखाव्यांना भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, शनिवारी मोठ्या प्रमाणावर भाविक आरास पाहण्यासाठी आले होते. रविवारीही (ता. १९) विकेंडमुळे गर्दी वाढणार असल्याने मंडळांकडून चोख नियोजन केले जात आहे. ---- चौकटीत घ्यावे चारधाम, गणपतीपुळे अन् खाटू श्याम देखाव्यांचे आकर्षण शहरातील विविध गणेश मंडळांनी यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त धार्मिक स्थळांच्या प्रतिकृती तसेच सजीव देखावे साकारले आहेत. हे देखावे गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत. गोविंदा रिक्षा स्टॉप परिसरातील वज्रेश्वरी देवी गणेश मंडळाने उत्तराखंडमधील चारधाम क्षेत्राचा देखावा साकारला आहे. यात गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या तीर्थक्षेत्रांची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. देखाव्यातील भव्य महादेवीची पिंड विशेष आकर्षण ठरत आहे. विसनजीनगरातील आझाद गणेश मित्र मंडळाने मंदिराची आकर्षक प्रतिकृती साकारली आहे. मंडळाचे यंदा ३७ वे वर्ष असून, गणरायाच्या दर्शनासोबत देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. बालाजीपेठेतील महाराणा प्रताप मित्र मंडळाने श्री क्षेत्र गणपतीपुळे मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. मंदिरातील मूर्तीचीही प्रतिकृती साकारण्यात आली असून, आठ फुटांची गणेशमूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान, बालाजी मित्र मंडळाने बाबा खाटू श्याम यांच्या जीवनावर आधारित सजीव देखावा साकारला आहे. मंडळाने बाबा खाटू श्याम यांच्या मूर्तीची स्थापना केली असून, दररोज रात्री दहापर्यंत हा सजीव देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. दरवर्षी सजीव देखाव्याची आरास करण्याची मंडळाची परंपरा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com