(पान १ ला मेन)
फोटो : NSK26H30069
नंदुरबार : वृक्षदिंडी सोहळ्यात केक कापताना डॉ. हीना गावित. शेजारी मान्यवर
----------------
मोदींच्या कार्यकाळात ग्रामीण विकासाला चालना
डॉ. हीना गावित यांचे प्रतिपादन; वृक्षदिंडी सोहळ्याचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १९ : नरेंद्र मोदी हे देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतरच ग्रामीण भागाचा कायापालट होण्यास सुरुवात झाली. मोदी सरकारने राबवलेल्या विविध योजनांमुळे छोट्या- छोट्या गावांचा देखील विकास होऊ शकला. तत्पूर्वी ग्रामीण भागाची सर्वत्र मोठी दुरावस्था होती, असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. हीना गावित यांनी केले.
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथे राष्ट्रीय हरित सेना अंतर्गत श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने आयोजित केलेल्या वृक्षदिंडी सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. डॉ हीना गावित यांच्या हस्ते व निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन, संस्थाध्यक्ष भास्कर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षदिंडीचे उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या हस्ते आणि मान्यवरांसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला. डॉ. हीना गावित यांनी वृक्षदिंडीचे पूजन केले. त्यानंतर वृक्षदिंडी मार्गस्थ झाली.
डॉ. गावित यांनी नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशाचा विकास किती झपाट्याने होत असल्याचे सांगून ग्रामीण भागाला कोणकोणते लाभ मिळाले आहेत, याची माहिती दिली. केवळ कार्यक्रमापुरते वृक्ष लागवड न करता आपल्या भोवतालचा ऑक्सिजन टिकवून ठेवण्याची गरज लक्षात घेऊन वृक्ष लागवड करणे गरजेचे असल्याचा मुद्दा त्यांनी विषद केला. क. पू. पाटील संस्थेचे अध्यक्ष भास्कर पाटील, माजी जि. प. सदस्य भिका पाटील, शानाभो धनगर, प्रल्हाद पाटील, जगदीश पाटील, लोटन पाटील, सूपडू पाटील, चंद्रशेखर पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.