सहायक निरीक्षकांना ‘निरीक्षक’ची संधी
नाशिकचे ४६ अधिकारी यादीत; महासंचालकांनी मागविले अहवाल
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १९ : महाराष्ट्र पोलिस दलातील १ हजार २३ सहायक पोलिस निरीक्षकांना पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील २६ आणि नाशिक ग्रामीण पोलिस दलातील १८ अशा ४४ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पोलिस महासंचालक कार्यालयाने संबंधित अधिकाऱ्यांची माहिती तसेच गेल्या पाच वर्षांचे गोपनीय अहवाल मागविले आहेत.
पोलिस महासंचालक कार्यालयाने राज्यातील पोलिस आयुक्तालये व अधीक्षक कार्यालयांना याबाबत आदेश दिले आहेत. प्राप्त कागदपत्रे आणि गोपनीय अहवालांची छाननी केल्यानंतर पदोन्नतीची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. पदोन्नतीनंतर काही अधिकाऱ्यांच्या इतर जिल्ह्यांत किंवा शहरांत बदल्या होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिक शहर व ग्रामीण पोलिस दलातील सहायक पोलिस निरीक्षकांची पदे रिक्त होऊन नवीन अधिकाऱ्यांना संधी मिळणार आहे.
ही पदोन्नती मुंबई उच्च न्यायालयातील रिट याचिका, पदोन्नतीतील आरक्षणाशी संबंधित ८४ पदे राखीव ठेवणे तसेच सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुज्ञा याचिकेच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून करण्यात येणार आहे.
नाशिक आयुक्तालयातील अधिकारी : योगेश पाटील, सुनील अंकोलीकर, रूपेश केदार, सत्यवान पवार, ज्ञानेश्वर मोहिते, गौतम सुरवाडे, राहूल मोरे, सुयोग वायकर, वसंत पवार, संदीप चोपडे, चंद्रकांत सपकाळे, हेमंत तोडकर, विश्वास चव्हाणके, सुरेश कोरबू, किरण रौंदळे, सचिन चौधरी, यतिनकुमार पाटील, गणेशपुरी बुवा, निखिल पवार, गणेश मुगले, सुमेध सोनोने, प्रवीण सूर्यवंशी, किरण कोरडे, निखिल बोंडे, सुधीर पाटील, तुषार देवरे, प्रकाश पाटील, उमेश बोरसे.
नाशिक ग्रामीणमधील अधिकारी : बालाजी शेडगे, संदीप पवार, रूपाली चव्हाण, सागर कोते, राकेशसिंह परदेशी, हेमंत भंगाळे, गौतम तायडे, अमोल पवार, गणेश शिंदे, संभाजी पाटील, पंकज निकम, दीपक निगळे, श्रीकांत पाटील, दीपक बिरारी, संतोष मुढे, संदीप परदेशी, सिद्धेश्वर आखेगावकर, नितीन रणदिवे.