टुडे पान २
NSK26H30065
जळगाव : स्वरवेध फाउंडेशनतर्फे भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर करताना कलावंत.
----------
स्वरवेध फाउंडेशनतर्फे
भक्तिगीतांचा कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १९ : येथील मोहाडी - शिरसोली रस्त्यावरील संत श्रेष्ठ गजानन महाराज बहुद्देशीय संस्था जीवन मोती सोसायटी आयोजित व स्वरवेध फाउंडेशन प्रस्तुत भक्तिरंग गजानन महाराज व इतर देवतांवरील भक्तिगीतांचा कार्यक्रम श्री गजानन महाराज मंदिरात करण्यात आला. संत श्रेष्ठ गजानन महाराज यांच्या समाधी दीन व ऋषी पंचमीनिमित्त या कार्यक्रमात विविध भक्तिगीते सादर करण्यात आली. सुरुवात या हो या हो गणनायका.. या गीताने निळकंठ कासार यांनी केली. नंतर क्रमाने ‘गण गण गणात बोते..’, ‘शेगावीचा राणा गजानन..’, ‘गजाननाच्या चरणी जुळवू या हृदयाचे नाते...’, ‘गण नायका गणपतीला माझ्या मोजता येत नाही मापाने..’ आदी भक्तिगीते भागवत पाटील, भालचंद पाटील, किशोर मोरे, सुमित परदेशी, नितीन पुराणिक, निळकंठ कासार यांनी सादर केली. निवेदन हर्षा पाठक यांनी केले. हार्मोनियम साथ सुशील महाजन व तबला साथ प्रवीण महाजन, तालवाद्य तेजस महाजन यांनी केले. शेगावीचा राणा समाधिस्थ झाला.. या भैरवीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
------