(धुळे- नंदुरबार पानासाठी सेकंड मेन)
--------
फोटो : NSK26H30072
नंदुरबार : येथील नगरपालिकेमार्फत गणेश मूर्ती संकलनासाठी करण्यात आलेली वाहन व्यवस्था. मूर्ती व निर्माल्य संकलन करताना आरोग्य विभागाचे कर्मचारी.
फोटो : NSK26H30068
नंदुरबार : शहरातील देसाईपुरा भागातील शिवलालभाऊ सोनार पालखी वाले यांच्या १४३ वर्षांची परंपरा असलेल्या प्रथम मानाच्या गणपतीची पालखीतून काढण्यात आलेली विसर्जन मिरवणूक.
फोटे : NSK26H30071
नंदुरबार : येथील वीर भगतसिंग व्यायामशाळेतर्फे काढलेली गणरायाची विसर्जन मिरवणूक.
फोटो : NSK26H30070
नंदुरबार : विसर्जन मिरवणुकीत पारंपरीक नृत्य सादर करताना.
---------------------------------------
नंदुरबार शहरातील २८ मंडळांतर्फे गणरायाला निरोप
ढोल - ताशांच्या गजरात विघ्नहर्त्याचा जयघोष करीत विसर्जन
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १९ : शहरासह जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्याचे तीलगणेश विजर्सन शनिवारी उत्साहात आणि शिस्तबध्द पध्दतीने पार पडले. या वेळी भव्य मिरवणुका काढून लाडक्या गणरायाला भावपुर्ण निरोप देण्यात आला. ढोल - ताशांच्या गजरात विघ्नहर्त्याचा जयघोष करीत विसर्जन मिरवणूका शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आल्या. पारंपरीक वाद्यांवर ठेका धरून गुलालाची उधळण करीत भक्तिमय वातावरणात गणेश भक्तांचा जल्लोष पहायला मिळाला.
------------
गौरी विसर्जनानिमित्त शहरासह जिल्ह्यातील सार्वजनिक ५९, एक गाव एक गणपतीचे तीन आणि खासगी दोन अशा एकूण ६४ गणेश मंडळांतर्फे गणरायाचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान, रविवारी सातव्या दिवशी जिल्ह्यातील २७५ गणेश मंडळांतफॅे गणरायाचे विसर्जन होणार आहे. यात १४८ सार्वजनिक, ६९ खासगी आणि ५८ ‘एक गाव- एक गणपती’ मंडळांचा समावेश आहे.
विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये सकाळपासून उत्साह दिसून आला. लेझीम पथके, विविध कसरती आणि पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर निघालेल्या मिरवणुकांनी शहराचे वातावरण भक्तिमय झाले होते. विविध गणेश मंडळे मंगळ बाजार पोलीस चौकी भागातून मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले. मिरवणुकीचा प्रमुख मार्ग मंगळ बाजार, गणपती मंदिर, सोनारखुंट, फडके चौकी, टिळक रोड, जळका बाजार रोड, शिवाजी चौक, राम मंदिर, सोनी विहीर असा होता. विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाल्या. २८ गणेश मंडळांमध्ये पालखीचा गणपती, महाराष्ट्र व्यायामशाळा, जय भारत व्यायामशाळा, वीर भगतसिंग व्यायामशाळा, जय संताजी व्यायामशाळा, संत शिरोमणी रोहिदास व्यायामशाळा, श्री संत नरहरी व्यायामशाळा, कुंभारवाड्याचा राजा गणेश मंडळ, स्वराज्य गणेश मित्र मंडळ, श्रीराम शाळा, शिवभक्ती गणेश युवक मंडळ, आदिवासी दिगंबर पाडवी व्यायामशाळा, कोरीट नाक्याचा राजा गणेश मंडळ, नंदुरबार नाभिक समाज गणेश मंडळ, वायुपुत्र व्यायामशाळा, वीरशैव लिंगायत व्यायामशाळा, आदर्श व्यायामशाळा, श्री संत रोहिदास व्यायामशाळा, जय हनुमान व्यायामशाळा, श्री दादा हनुमान गणपती व्यायामशाळा, छत्रपती शिवाजी व्यायामशाळा, जाणता राजा मित्र मंडळ, द्वारकाधीश व्यायामशाळा, हाटदरवाजा गणेश मंडळ, वीर एकलव्य गणेश मंडळ आदी मंडळांचा समावेश होता.
पारंपरीक वाद्यावर भर
शहरातील देसाईपुरा भागातील शिवलालभाऊ सोनार पालखी वाले गणपती मिरवणुकीच्या अग्रभागी होता. महाराष्ट्र व्यायामशाळा, चर्मकार समाज, मिरवणुकांमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठी गर्दी झाली होती. जिल्ह्यातील शहादा, तळोदा, नवापूर आणि अक्कलकुवा या भागातही दुसऱ्या टप्प्यातील विसर्जन शांततेत पार पडल्याचे वृत्त आहे. कुठेही अनुचित प्रकार न घडता, अतिशय शिस्तबद्ध आणि शांततापूर्ण वातावरणात हा उत्सव संपन्न झाल्यामुळे पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
मिरवणुकीदरम्यान विविध तालीम मंडळांच्या पथकांनी चित्तथरारक कसरती सादर केल्या. तसेच, लाठी- काठी, लेझीम आणि पारंपरिक पथकांनी गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेतले होते. श्रीरामपूर येथील आदिवासी कला पथकाने पारंपरीक नृत्य सादर केले. शाळा- महाविद्यालयांनी मिरवणुकांमध्ये सहभाग नोंदविला. गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिल्याचे दिसून आले. रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुका सुरू होत्या.
नगर पालिकेतर्फे कृत्रीम तलाव
नगरपालिकेने सोनी विहीरीजवळ विसर्जनासाठी आवश्यक ती सुविधा उपलब्ध केली होती. त्याचप्रमाणे शहरात तीन ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रीम तलाव तयार करण्यात आले होते. यामध्ये मोठा मारूती, सी. बी. चौफुलीसह नळवा रस्त्यावरील दोन ठिकाणी कृत्रीम तलाव होते. तापी नदीपात्रात होणाऱ्या गणपतीच्या विसर्जनासाठी चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. विविध तलावांमध्येही गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
चोख बंदोबस्त
बंदोबस्तासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी, दोन पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षकांसह १६० पोलिस अधिकारी- कर्मचारी आणि १३० होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात होते. गणेशोत्सव विसर्जन बंदोबस्तासाठी बाहेरुन एक पोलिस उपअधीक्षक, दोन पोलिस निरीक्षक आणि ५ एपीआय, पीएसआय दाखल झाले आहेत. याशिवाय ७५ पुरुष व ३० महिला पोलिस कर्मचारी, एसआरपीएफची एक कंपनी, ७०० पुरुष व १५० महिला होमगार्ड यांचीही मदत घेण्यात आली.