महिरावणीच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा सन्मान

महिरावणीच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा सन्मान
Published on
NSK26H30066 महिरावणी : लायन्स क्लब ऑफ नाशिक रॉयल्सतर्फे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा सन्मानप्रसंगी उपस्थित पदाधिकारी. महिरावणीच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा सन्मान सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १९ : महिरावणी येथील जिल्हा परिषद शाळेत लायन्स क्लब ऑफ नाशिक रॉयल्सतर्फे शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. नुकत्याच झालेल्या या कार्यक्रमात शाळेतील आठ शिक्षकांचा गौरव करण्यात आला. दीपक नाना उशीर, सुनील अभिमान भामरे, रवींद्र रघुनाथ चौरे, राजेश दौलत बोराडे, वंदना सुभाष साईनकर, अलका गंगाराम वाणी, कल्पना संजय चौधरी आणि शीतल अशोक सूर्यवंशी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. शाळेच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वापरासाठी क्लबतर्फे पाच हिरवे फलक (ग्रीन बोर्ड) देण्यात आले. त्यासाठी क्लबचे सदस्य तुषार अमृतकर यांनी आर्थिक सहकार्य केले. कार्यक्रमास पीडीजी राजेश कोठावदे, अध्यक्ष कुणाल मुसळे, मनीष अहिरे, विभागीय अध्यक्ष राहुल वेढणे, भूषण महाजन, तुषार अमृतकर, सचिव संध्या कोठावदे, स्मिता अमृतकर, विशाल वाणी, महिंद्र बच्छाव आणि स्मिता बच्छाव उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन स्मिता अमृतकर व तुषार अमृतकर यांनी केले. लायन्स क्लबच्या ‘वी सर्व्ह’ उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com