आज आरोग्य शिबिर

आज आरोग्य शिबिर
Published on
धुळे ः मुख्य अंकात -- धुळ्यात आज आरोग्य शिबिर - विविध आजारांवर मोफत तपासणीसह मार्गदर्शन सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १९ : गणेशोत्सवानिमित्त जय बालाजी ग्रुप सांस्कृतिक मित्रमंडळ आणि श्री चिंतामणी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटरतर्फे रविवारी (ता. २०) महाआरोग्य निदान शिबिर होणार आहे. ते सकाळी दहा ते दुपारी तीनपर्यंत वरखेडी रोडवरील बांबू गोडाऊनसमोर होईल. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले. --- शिबिरात डॉ. वैभव बडगुजर हे रुग्णांची मोफत तपासणी व मार्गदर्शन करतील. शिबिरामध्ये अनियंत्रित डायबेटिस व उच्च रक्तदाब (बीपी), थायरॉईड, संधिवात, यकृत व किडनीचे विकार, मुळव्याध, भगंदर, फुफ्फुस व श्वसनाचे आजार, पॅरेलिसिस, फिट येणे, मायग्रेन, पचनाचे व पोटाचे विकार, जुनाट हाडे व सांधेदुखी आदी रूग्णांची तपासणी व मार्गदर्शन केले जाईल. शिबिरात ईसीजी, शुगर आणि बीपी, बीएमआय, युरिक एसीड आणि एचबी आदी मोफत तपासणी सुविधा उपलब्ध असेल. आहारविषयक सल्ला, अनियंत्रित रक्तदाब व मधुमेहाविषयी विशेष मार्गदर्शन केले जाईल. नावे नोंदणीसाठी ९३५६३ ४४२९७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जय बालाजी ग्रुप सांस्कृतिक मित्र मंडळातर्फे लोकेश सूर्यवंशी, सचिन बडगुजर यांनी केले. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com