त्र्यंबकेश्वर मंदिर आवारात दगड बसविणे सुरु

त्र्यंबकेश्वर मंदिर आवारात दगड बसविणे सुरु
Published on
मुख्य अंक पान ३ ----------------- NSK26H30081 त्र्यंबकेश्वर ः येथील श्री त्र्यंबकेश्वराच्या मंदिराच्या आवारातील निखळलेले दगड कोरीव घडवून बसविणे सुरु असताना. (छायाचित्र ः कमलाकर अकोलकर) -------------- त्र्यंबक मंदिर प्रांगणातील दगडांचे काम अयोग्य ------------ अध्यक्ष विवेक सोनुने यांनी केली पाहणी ः पुरातत्व खात्याला तातडीने पत्र देणार ------------ सकाळ वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर, ता.१९ ः श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणातील झिजलेल्या दगडांच्या ठिकाणी भारतीय पुरातत्त्व विभागातर्फे नव्याने दगड बसविण्यात येत असून काही जुनेच घासून बसविले जात आहेत. मंदिराच्या आवारात असलेले काही दगड उखडून साधे व साधर्म्य नसणारे दगडी चिरे लावण्यात येत असल्याने भाविक व ग्रामस्थांची नाराजी व्यक्त होत होती. दरम्यान दगड बसविण्याचे काम मूळ कामाशी एकरूप नसल्याचे सांगत देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विवेक सोनुने यांनी ते थांबविण्याचे पत्र पुरातत्त्व खात्यास देणार असल्याचे शनिवारी (ता.१९) पाहणीअंती सांगितले. ------------- त्र्यंबकेश्वर आद्य ज्योतिर्लिंग मंदिराचे संवर्धन व दुरुस्ती भारतीय पुरातत्त्व खात्यातर्फे केले जाते. कुंभमेळा कालावधीत पुरातत्त्व खात्याकडे मोठ्या प्रमाणावर विविध मंदिरे व तलावांच्या संवर्धनाचे काम सुरु असून त्र्यंबकेश्वर मंदिर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गळते, ती गळती बंद होणे गरजेचे आहे. या मंदिराच्या बाहेरील भागाला घासून स्वच्छ करण्यात येत असून सहा ते सात महिन्यापासून बांबूचे पहाड बांधण्यात आले आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे काम लांबत चालले आहे. त्यात मंदिराच्या प्रांगणातील दगडाचे वरील काही भाग तुटत चालले आहेत. दगड काढल्यावर खालील भाग भक्कम असून दोनशे वर्षांपूर्वी ते लावले आहेत. तेथे सध्या नवीन वापरले जाणारे दगड भक्कम नसून त्यांची उंची व रुंदीही मेळखात नसल्याचे दिसून येते. जुने व मध्येच नविन अशी विचित्र प्रकार मंदिराच्या प्रांगणाचे सौदर्यच घालवत आहे. ------------ या मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष धर्मादाय सहाय्यक आयुक्त विवेक सोनुने यांनी शनिवारी येथे देवस्थानच्या गणेश उत्सवानिमित्त भेट दिली, त्यांना याबाबतची माहिती विचारली असता त्यांनी पुरातत्त्व खात्यातर्फे हे काम सुरू केले असले तरीही अयोग्य असल्यास ते थांबविता येते. मी स्वतः पाहणी केली असून मूळ स्वरूपात ते दिसत नसल्याने बंद करण्यात यावे असे पत्र संबंधित खात्याला देत असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com