धुळे पोलिसांवर हल्ला

धुळे पोलिसांवर हल्ला
Published on
पान पाच साठी ------------ मोहाडीत दगडफेकीतून पोलिसांवर हल्ला ‘एलसीबी‘च्या पथकाकडून तलवार, कट्यारीसह पिस्टल जप्त - सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १९ : घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयिताला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकावर दगडफेक करीत तलवार व कट्यारीने हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना मोहाडी उपनगरातील दंडेवालाबाबानगरात घडली. या हल्ल्याला न जुमानता पथकाने फतेसिंग मिलनसिंग भादा याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून नेर (ता. धुळे) येथील चोरीतील परवानाधारक पिस्टल, दोन मॅक्झिन, आठ जिवंत काडतुसे, एक तलवार व कट्यार असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. नेरला बारा सप्टेंबरला मंत्रालयात सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या निवृत्त जवानाच्या घरातून परवानाधारक पिस्टल, दोन मॅक्झिन, आठ जिवंत काडतुसे, २० हजार रुपये रोख व ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. या घटनेच्या समांतर तपासात भादा टोळीचे नाव समोर आल्यानंतर एलसीबीच्या पथकाने रात्री दोनला दंडेवालाबाबानगरात सापळा रचला. पोलिस पथक आल्याची कुणकुण लागताच फतेसिंग भादासह त्याच्या साथीदारांनी शिवीगाळ करीत पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. काही जणांनी तलवार व कट्यारीने हल्ल्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत हल्ला चुकविला आणि फतेसिंग भादा याला ताब्यात घेतले. या वेळी त्याचे इतर साथीदार अंधाराचा फायदा घेत पसार झाले. फतेसिंग भादा याचा पाचपेक्षा अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांत सहभाग असल्याचे तपासात समोर आले असून, या घरफोड्यांतील सोन्या-चांदीचे दागिने त्याने मित्रामार्फत पाचोरा येथील सोनाराला विकल्याची माहिती पुढे आली आहे. त्यातून त्याला १२ ते १५ लाख रुपये मिळाल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिस कर्मचारी दिनेश परदेशी यांच्या फिर्यादीनुसार फतेसिंग मिलनसिंग भादा, चॅम्पियनसिंग मिलनसिंग भादा, राजवीरसिंग मिलनसिंग भादा, मंजितसिंग जनरलसिंग सरदार, अजयसिंग टाक, आकाश गजानन मरसाळे, सोमनाथ साहेबराव हातागळे, गोरख किरण लोंढे, हेमंत चंद्रपाल साहू व रोहित ऊर्फ बेंड्या नारायण वाघमोडे यांच्याविरुद्ध मोहाडी पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला. पसार संशयितांचा शोध सुरू आहे. पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, सहायक पोलिस निरीक्षक दीपक ढोके, हवालदार दिनेश परदेशी, सदेसिंग चव्हाण, शिरीष भदाणे, हेमंत बोरसे, पंकज खैरमोडे, सचिन गोमसाळे, हवालदार अतुल निकम, महेंद्र सपकाळ, राणी दामोदर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com