परवाना नसताना कीटकनाशक विक्री

परवाना नसताना कीटकनाशक विक्री
Published on
टुडे एकसाठी --------- परवाना नसताना कीटकनाशक विक्री -------- मध्य प्रदेशातील कंपनीविरोधात गुन्‍हा; कृषी विभागाच्या तपासात प्रकार उघड सकाळ वृत्‍तसेवा जळगाव, ता. २० : महाराष्ट्र राज्यात कीटकनाशकांच्या विक्रीसाठी आवश्यक वैध परवाना नसतानाही मध्य प्रदेशातील राज पेस्टीसाईड्स प्रा. लि. कंपनीची कीटकनाशके महाराष्ट्रात विक्री केली जात होती. याप्रकरणी प्राप्‍त तक्रारीवरून कृषी विभागाच्‍या तपासात हा प्रकार समोर आला. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात मध्‍य प्रदेशाातील कंपनीविरोधात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात वैधविक्री परवाना नसलेल्या कंपनीची कीटकनाशके खरेदी किंवा विक्री करण्यास परवानगी नाही. असे असले तरी मध्‍य प्रदेशातील राज पेस्‍टीसाईडस्‌ कंपनीकडून राज्‍यात कीटकनाशकांची विक्री केली जात होती. कृषी विभागाच्या तपासणीत राज पेस्टीसाईड्स प्रा. लि.च्या उत्पादनांना महाराष्ट्र राज्यात विक्रीचा परवाना नसताना, संबंधितांनी डी.एन.सी. ॲग्रो वैजापूर (ता.चोपडा) येथील कृषी सेवा केंद्र चालकाची दिशाभूल करून कंपनीची उत्पादने विक्री केल्याचे तपासात निदर्शनास आले. कृषी विभागाचेही सहकार्य या प्रकरणाच्या तपासात मध्‍य प्रदेशातील कृषी विभागाचे संचालक यांनी विशेष सहकार्य केले. संबंधित कंपनीचे नोंदणीकृत सर्टिफिकेट व मध्य प्रदेश राज्यातील उत्पादन/विक्री परवान्याबाबत आवश्यक माहिती व कागदपत्रे तपास यंत्रणेला उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्राबाहेरील कंपनीच्या उत्पादनांच्या वैधतेबाबत तपासाला महत्त्वपूर्ण मदत झाली. यात २ लाख ८२ हजार रुपयांचे कीटकनाशक जप्‍त केली आहेत. कंपनीविरोधात गुन्‍हा दाखल परवाना नसताना किटकनाशक विक्री केली जात असल्‍याचा प्रकार समोर आल्‍यानंतर कृषी विभागाच्‍या तक्रारीवरून चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात कंपनीचे प्रतिनिधी, विक्री प्रतिनिधी शिवशंकर यादव, मध्य प्रदेशातील सुपर ॲग्रो, धवली रोड, बलवाडी, ता. वरला, जि. बडवानी येथील कीटकनाशक विक्रेत्याविरुद्ध कारवाई करण्यात आल्‍याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com