बालरंगभूमी परिषदेचा ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव

बालरंगभूमी परिषदेचा ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव
Published on
फोटो : H30092 -- साडेतीनशे बालकलाकारांनी गाजविले व्यासपीठ बालरंगभूमी परिषदेचा ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २० : लोप पावत चाललेली महाराष्ट्राची पारंपरिक लोककला लहान मुलांमध्ये रुजावी आणि नव्या पिढीला हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने बालरंगभूमी परिषद नाशिक शाखेतर्फे आयोजित ‘जल्लोष लोककलेचा २०२६’ महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. अशोकस्तंभ परिसरातील रुंगटा शाळेत शनिवारी (ता. १९) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवात ६ ते १५ वयोगटातील तब्बल साडेतीनशे बालकलाकारांनी आपल्या कलागुणांचे अप्रतिम सादरीकरण करत रंगमंच गाजविला. महोत्सवाच्या पारितोषिक वितरणप्रसंगी अखिल भारतीय नाट्य परिषद नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, बालरंगभूमी परिषद नाशिक शाखेचे अध्यक्ष महेश डोकफोडे, विश्वास बँकेचे संचालक विश्वास ठाकूर, खजिनदार संजय भुजबळ, डॉ. स्वप्नील तोरणे, सनी धात्रक, पूनम पाटील उपस्थित होते. परीक्षक म्हणून शाहीर प्रा. प्रवीण जाधव, प्रणिल तिवडे, समाधान मुर्तडक यांनी जबाबदारी पार पाडली. डोकफोडे यांनी प्रास्ताविकात बालरंगभूमी परिषद शाळांसाठी मातृसंस्था म्हणून काम करेल असे स्पष्ट करीत शहरातील शाळा, कलासंस्थांना कलाक्षेत्रात मदतीची गरज भासल्यास परिषद मदत करण्यास कायम सोबत असेल. यावेळी सुनील ढगे यांचा विशेष नागरी सत्कार करण्यात आला. स्वागत व सूत्रसंचालन प्रमुख कार्यवाह केतकी कुलकर्णी यांनी केले. कार्याध्यक्ष विनोद राठोड यांनी आभार मानले. -- विजेत्या विद्यार्थी व शाळांची नावे -एकल वादन : गौतमी गायकवाड, क्षितिज उनवणे, कृष्णा आहेर, अनन्या सोनवणे. -एकल गायन : विराज लोंढे, निसर्ग वाटाणे, कामाक्षी सोनवणे, वैष्णवी लहामगे. -एकल नृत्य : अन्वी पिंगळे, लावण्या खिस्ते, अनया पवार, वेदिका काळे/ मनवा धर्माधिकारी. -समूह गायन : होरायझन अकादमी, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, विद्या प्रबोधिनी शाळा, सरस्वती विद्यालय. -समूह नृत्य : सरस्वती विद्यालय, संत ज्ञानेश्वर (वाहेगाव), होरायझन अकादमी, र. ज. चव्हाण बिटको कन्या विद्यालय, नवरचना विद्यालय. --------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com