कोंडाजी तालीम गणेशोत्सवात

कोंडाजी तालीम गणेशोत्सवात
Published on
धुळे ः टुडे २ साठी -- फोटो क्रमांक ः 30079 व 30080 धुळे : कोंडाजी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव समितीतर्फे गणरायाची आरती करताना राजवर्धन कदमबांडे, प्रदीप कर्पे, चेतन मंडोरे आदी. दुसऱ्या छायाचित्रात गणेशमूर्ती. -- कोंडाजी तालीम गणेशोत्सवात उत्साह - महापौरांसह राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते महाआरती सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २० : गणेशोत्सवात प्रभाग क्रमांक सहामधील छत्रपती शिवाजी पुरा येथील ऐतिहासिक कोंडाजी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव समितीतर्फे महापौर मायादेवी परदेशी, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते गणरायाची महाआरती करण्यात आली. महापौर मायादेवी परदेशी आणि महादेव परदेशी यांच्या हस्ते आकर्षक देखाव्याचे लोकार्पण करण्यात आले. तालमीचे अध्यक्ष भगवान कालेवार, समितीचे अध्यक्ष सोनू खैरनार, माजी महापौर प्रदीप कर्पे, चंद्रकांत सोनार, सुनील महाले, चेतन मंडोरे, सनी चौधरी, प्रतीक कर्पे, रोहित चांदोडे, रमेश शिरसाट, संजय गुजराथी, मिलिंद मुंदडा, ज्ञानेश्वर कोरे, पहिलवान करनकाळ, राहुल तारगे, कैलास मराठे, भाऊसाहेब चौधरी, संजय बागुल, भाऊसाहेब सूर्यवंशी, सुधीर मगर, कन्हैया अहिरे, संजय भारस्कर, मयूर खोपडे, प्रमोद चौधरी, योगेश चौधरी आणि आबा भडांगे उपस्थित होते. मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. नंतर नागरिकांनी गणरायाचे दर्शन घेत देखाव्याची पाहणी केली. तालमीचे सदस्य, गणेशोत्सव समितीचे कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com