सामूहिक गणपती अथर्वशीर्ष पठण

सामूहिक गणपती अथर्वशीर्ष पठण
Published on
मेनफिचर शहर टुडे पान चारसाठी - NSK26H30101 व NSK26H30104 जळगाव : सुभाष चौकातील गणेशमूर्तीसमोर गणपती अथर्वशीर्ष पठण करताना आचार्य महेशकुमार त्रिपाठी, अधयक्ष श्रीकांत खटोड आदी. दुसऱ्या छायाचित्रात अथर्वशीर्ष पठणात सहभागी भाविक. ------------------ शहरात सामूहिक २१ गणपती अथर्वशीर्ष पठण ----- हजारो भाविकांचा सहभाग; सुभाष चौक मित्र मंडळ, स्वामी समर्थ केंद्राचा उपक्रम सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.२० : अथर्व मुनींनी रचलेली संस्कृत रचना व गणपतीची सर्वोच्चस्तुती असलेल्या गणपती अथर्वशीर्षाच्या जयघोषाने रविवारी (ता.२०) संपूर्ण जळगाव शहर भक्तिमय झाले. निमित्त होते जळगावचे मानाचे स्थान असलेल्या सुभाष चौक मित्र मंडळ, सुभाष चौक नागरी पतसंस्था व श्री स्वामी समर्थ केंद्र यांच्यातर्फे आयोजित सामूहिक २१ अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे. रविवारी सकाळी नऊ ते ११ या वेळेत सुभाष चौकातील मानाच्या गणपतीच्या सन्मुख अत्यंत शास्त्रशुद्ध व मंगलमय वातावरणात हा उपक्रम झाला. मुखोद्गत असलेल्या सुमारे तीन हजार भाविकांनी एकाच स्वरात व एकाच तालात धाराप्रवाहितपणे लागोपाठ २१ आवर्तने केली. त्यामुळे अवघ्या दोन तासांत ५० हजारांपेक्षा अधिक सामूहिक आवर्तनांचा नाद घुमला. संपूर्ण सुभाष चौक परिसर हजारो भाविकांनी खचाखच भरून गेला होता. सुसंस्कारीत पिढीसाठी आराधना प्रमुख आचार्य वेदमूर्ती पंडित महेशकुमार त्रिपाठी यांनी अथर्वशीर्षाचे महात्म्य कथन केले. श्री गणेश हे विद्येचे आराध्य दैवत आहे. पहिलीपासून ते उच्चशिक्षणापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी गणेशाची आराधना केली पाहिजे. गणपतीच्या कृपेने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्तावाढीस लागते व सुसंस्कारीत भावीपिढी निर्माण होते, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रसमृद्धी, शांततेचा महासंकल्प हजारो भाविकांच्या मुखातून निघालेल्या मंत्रोच्चारांमुळे परिसरात एक अद् भूत ऊर्जा निर्माण झाली होती. या पवित्र ऊर्जेतून राष्ट्रसमृद्ध व्हावे, जळगाव शहर व जिल्ह्यात शांतता, सुबत्ता, समृद्धी व एकोपा नांदावा, राष्ट्रोन्नतीत कोणतेही विघ्न येऊ नये, असा सामूहिक महासंकल्प सर्व भाविकांनी यावेळी सोडला. वातावरणात प्रसन्नता भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये, म्हणून सुभाष चौकात भव्य मांडव टाकण्यात आला होता. परिसर स्वच्छ करून आंब्याची तोरणे, झेंडूच्या फुलांच्या माळा, भगवे ध्वजाने सजविल्याने संपूर्ण परिसरातील वातावरण प्रसन्न झाले होते. भाविकांसाठी बिछायत, अष्टगंध टिळा, महिलांसाठी हळदी-कुंकू, अथर्वशीर्ष पुस्तिका वाटप, महाप्रसाद व पादत्राणांसाठी दोन विशेष स्टॉल्स लावण्यात आले होते. शंभरावर कार्यकर्त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध रीतीने हा सोहळा यशस्वी केला. दुग्धाभिषेक, दुर्वाभिषेक, लकी ड्रॉ कार्यक्रमाची सुरुवात शंखनाद, ओंकार ध्वनी, गणपती पूजन, शांतीपाठ व अथर्व महात्म्य पठणाने झाली. या सोहळ्यात मुख्य मूर्तीवर शास्त्रोक्त पद्धतीने दुग्धाभिषेक व दुर्वाभिषेक करण्यात आला. दुग्धाभिषेकाचा मान रोहन संपनकुमार झुंझुनवाला व दुर्वाभिषेकाचा मान सपन सुशीलकुमार झुणझूनवाला या दांपत्यांना मिळाला. या अभिषेकातून पावन झालेले गणपतीचे ५१ चांदीचे शिक्के उपस्थित भाविकांना ''लकी ड्रॉ''द्वारे कूपन क्रमांक काढून अत्यंत आनंदी वातावरणात भेट देण्यात आले. या सोहळ्यातून निर्माण झालेल्या सकारात्मक ऊर्जेने संपूर्ण जगाचे कल्याण व्हावे, अशी प्रार्थना शेवटी करण्यात आली. सुभाष चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत खटोड, प्रकल्प प्रमुख मनीष अग्रवाल, प्रवीण बांगर, आदित्य खटोड, हरीश चव्हाण, अक्षय खटोड, समर्थ खटोड, संजय पांडे, अलोक अग्रवाल, महेश दायमा, नरेंद्र कापडणे, भरत शाह, गोपाल पाटील, पंकज गव्हाळे, प्रमोद भामरे, विनोद रामावत आदींनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com