दीपक तरुण मंडळाने साकारली श्री स्वामीनारायण मंदिराची आरास

दीपक तरुण मंडळाने साकारली श्री स्वामीनारायण मंदिराची आरास
Published on
शहर टुडे पान तीनसाठी NSK26H30108 जळगाव : जुन्या जळगावातील रथ चौक परिसरातील दीपक तरुण मंडळाने साकारलेली श्री स्वामी नारायण मंदिराची आरास. ---- NSK26H30109 जळगाव : दीपक तरुण मंडळाची पंचमुखी गणेशाची विलोभनीय मूर्ती. ------- दीपक तरुण मंडळाने साकारली स्वामी नारायण मंदिराची आरास ---- मंडळाचे ५४वे वर्ष; पंचमुखी मूर्ती ठरतेय आकर्षण सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २० : शहरातील रथ चौक परिसरातील दीपक तरुण मंडळाचे यंदा ५४वे वर्ष असून, श्रींची पंचमुखी स्वरूपातील देखणी मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. सोबतच मंडळाने यंदा स्वामी नारायण मंदिर संस्थान जळगाव यांच्या सहकार्याने श्री स्वामी नारायण मंदिराची भव्य आरास साकारली आहे. हा देखावा साकारण्यासाठी मंदिराचे विश्‍वस्त प्रमोद झांबरे व नयन स्वामी महाराज यांनी मार्गदर्शन केले. मंडळाची स्थापना १९७२मध्ये जनसंघाच्या प्रेरणेतून करण्यात आली. जनसंघाची निशाणी दीपक यावरून मंडळाचे नाव दीपक तरुण मंडळ असे ठेवण्यात आले. श्रींची देखणी स्वरूपातील गणेश मूर्ती व विसर्जन मिरवणुकीत शिस्तबद्ध लेझीम, कसरती दाखविणे हे मंडळाची वैशिष्ट्ये आहेत. यंदा मंडळाने श्रींची पंचमुखी रुपातील विलोभनीय मूर्ती साकारली आहे. मंडळाच्या कार्यालयात वर्षभर अंगणवाडी वर्ग चालविले जातात. वर्षभरात गावगुढी पूजन, श्रीराम नवमी, श्रीराम रथोत्सव व वाहनाची पानसुपारी व इतर अनेक उपक्रम राबविले जातात. यंदा मंडळाचे अध्यक्ष म्हणून श्री कवीश्वर सपकाळे, उपाध्यक्ष प्रमोद तांबट व खजिनदार दीपक ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com