आरास पाहण्यासाठी गर्दी; खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर उलाढाल वाढली

आरास पाहण्यासाठी गर्दी; खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर उलाढाल वाढली
Published on
मेनफिचर शहर टुडे पान तीनसाठी -------------------- NSK26H30125 जळगाव : गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी लागलेली महिलांची रांग. ------------ NSK26H30126 जळगाव : खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्यांवर झालेली गर्दी. -------------------------- आरास पाहण्यासाठी शहरात गर्दी -------- खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरील उलाढालीत वाढ; रात्री बाहेर खाण्यालाच पसंती सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २० : शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी साकारलेल्या आरास व देखावे पाहण्यासाठी नागरिकांची पावले आता ठिकठिकाणी वळताना दिसून येत आहेत. सायंकाळनंतर कुटुंबीयांसह आरास पाहण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची गर्दी वाढत असून, आरास पाहत रात्री उशिर होत असल्‍याने बाहेर खाणेच अनेकजण पसंत करीत आहेत. दरम्यान, बाहेर खाणाऱ्यांची संख्या वाढल्याने त्याचा थेट फायदा सार्वजनिक गणेश मंडळांच्या परिसरात उभारण्यात आलेल्या विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलधारकांना होत आहे. त्यामुळे मागील तीन-चार दिवसांपासून उलाढाल वाढून रोज साधारण तीन ते चार लाख रुपयांपर्यंत गेलेली आहे. श्रीगणेशोत्सवाच्या काळात शहरातील प्रमुख रस्ते व सार्वजनिक गणेश मंडळांचे परिसर रात्रीच्या वेळी गर्दीने फुलून जात आहेत. विद्युत रोषणाई, आकर्षक सजावट व विविध विषयांवरील देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडताना दिसून येत आहेत. आरास पाहून झाल्यानंतर कुटुंबांसह खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्याकडे नागरिकांचा कल असल्याने स्टॉलधारकांच्या व्यवसायात वाढ झालेली आहे. विविध पदार्थांना मागणी शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या परिसरात उभारलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर सर्वाधिक गर्दी चाट, पाणीपुरी व भेळसाठी होत आहे. यासोबतच लहान मुलांसह तरुण व कुटुंबीय चायनीजसह वडापाव, डोसा, पावभाजीच्‍या गाड्यांवर जात पदार्थांचा आस्वाद घेताना दिसत आहेत. सायंकाळी गर्दी सुरू झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत या स्टॉलवर ग्राहकांची वर्दळ कायम राहत आहे. त्यामुळे यातून हेाणारी उलाढालदेखील वाढली आहे. लघुव्यावसायिकांना फायदा श्रीगणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक छोट्या व्यावसायिकांनी तात्पुरते खाद्य पदार्थांचे स्टॉल उभारले आहेत. चाट-पाणीपुरीपासून सँडविच, पिझ्झा, आइस्क्रीम व विविध स्नॅक्सपर्यंत पदार्थ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विशेष म्‍हणजे रविवारी (ता.२०) अधिक गर्दी असल्‍याने विक्रेत्यांनी गणेशोत्सवातील गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त मालाची तयारी केली होती. त्यामुळे इतर दिवसांच्‍या तुलनेत रविवारी रात्रीची उलाढाल अधिक राहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com