धुळे : टुडे पान २ साठी...
--
फोटो क्रमांक : 30130
धुळे : साक्री रोडवरील जय झुलेलाल मित्र मंडळाच्या गणेशाची आरती करताना पदाधिकाऱ्यांसह स्थानिक रहिवासी.
--
जय झुलेलाल मित्र मंडळाच्या ‘भूत बंगल्या’चा थरार
--
गणेशभक्तांची गर्दी; साक्री रोडवरील देखावा ठरतोय आकर्षणाचे केंद्र
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २० : साक्री रोडवरील कुमारनगर येथील जय झुलेलाल मित्र मंडळाने यंदा गणेशोत्सवानिमित्त ‘हॉरर शो- भूत बंगला’ देखावा साकारला आहे. गेल्या १९ वर्षांची परंपरा असलेल्या या मंडळाने गतवर्षीच्या प्रतिसादानंतर यंदा अधिक थरारक स्वरूपात ही आरास खुली केली असून, ती पाहण्यासाठी शहर परिसरातून भाविकांची गर्दी होत आहे.
आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते या देखाव्याचे उद्घाटन झाले. महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, स्थायी समिती सभापती लता पोतदार, नगरसेविका किरण कुलेवार, नगरसेवक धीरज परदेशी, नगरसेवक ललित आरूजा, महिला व बालविकास समिती सभापती उज्ज्वला ठाकरे, नगरसेविका पूनम शिरसाठ, नगरसेविका प्रतिभा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. अत्यंत कल्पकता व मेहनतीने साकारलेल्या या देखाव्यात भीतीदायक वातावरण, आकर्षक सजावट, विशेष प्रकाशयोजना, ध्वनिव्यवस्था आणि थरारक प्रसंगांची जोड देण्यात आली आहे. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्येच या हॉरर शोबाबत मोठे कुतूहल निर्माण झाले आहे. मंडळाचे अध्यक्ष पवन गुंडीयाल, कमल लुंड, रिक्की गलानी, धीरज परदेशी, हितू रोहेडा, अन्नी गलानी, सार्थक, जितू पाटील, अनुप डियलाणी, वरुण लुल्ला, सागर भगत, सागर बुडाणी, चंदू खिलवाणी, जगदीश राणा, मन्नू तोलानी आणि सच्चु संतानी परिश्रम घेत आहेत. धुळेकरांनी या थरारक देखाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.