टुडे पान २ साठी... अवतीभवती

टुडे पान २ साठी... अवतीभवती
Published on
धुळे : टुडे पान २ साठी... अवतीभवती -- फोटो क्रमांक : 30134 धुळे : कष्टभंजन गणेश मंडळातर्फे साकारण्यात आलेली पर्यावरणपूरक श्री शंकर महादेवाची मूर्ती. -- पर्यावरणपूरक १५ फूट उंचीची शंकर महादेव मूर्ती धुळे : येथील कष्टभंजन गणेश मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त १५ फूट उंचीची पर्यावरणपूरक श्री शंकर महादेवाची मूर्ती साकारण्यात आली आहे. ही मूर्ती बनवण्यासाठी वृंदावनची माती, गायीचा हिरवा चारा आणि वडाच्या पारंब्यांचा वापर करण्यात आला आहे. पारंपरिक भक्तीला पर्यावरण संवर्धनाची जोड देणारी ही मूर्ती भाविकांचे मुख्य आकर्षण ठरत आहे. दरम्यान कुमारनगर येथील सहजीवन ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांना गणरायाची आरती करण्याचा मान मिळाला. सहजीवन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष हर्षकुमार रेलन यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते आरती करण्यात आली. आरतीनंतर ज्येष्ठ नागरिकांनी कष्टभंजन गणेश मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे कौतुक केले. मंडळाची ही पर्यावरणपूरक मूर्तीची संकल्पना समाजासाठी प्रेरणादायी असल्याची भावना त्यांनी या वेळी व्यक्त केली. -- शिवनेरी मित्रमंडळात अथर्वशीर्ष पठण धुळे : गणेशोत्सवानिमित्त शहरातील शिवनेरी मित्रमंडळातर्फे सामूहिक गणपती अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले. गणेशपूजेनंतर परिसरातील महिलांनी एकमुखाने अथर्वशीर्षाचे पठण केले. सामूहिक पठणाने आणि गणरायाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. या उपक्रमात प्रतिभा नेवे, रंजना नेवे, मीनाक्षी चिंचोले, शोभना चौधरी, प्रतिभा कानकाटे, पद्मा कानकाटे, शुभांगी लोखंडे, रत्ना ठक्कर, अक्षया कानकाटे, वैशाली कोठावडे, मीना मोरे, अश्विनी भडांगे व शेजल पाटील यांच्यासह परिसरातील महिलांनी सहभाग घेतला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामूहिक उपासना आणि संस्कारमूल्यांची जोपासना करणाऱ्या या धार्मिक उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. -- भाषा संस्कृतीची खरी धरोहर धुळे : भाषा ही संस्कृतीची धरोहर असून, तिचे संवर्धन करा, असे प्रतिपादन प्राचार्य पी. एस. सोनवणे यांनी मनोगतात केले. श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या आघाव अध्यापक विद्यालयात राष्ट्रभाषा हिंदी दिन उत्साहात साजरा झाला, यावेळी प्राचार्य सोनवणे बोलत होते. उपप्राचार्य एम. टी. पाटील प्रमुख अतिथी होते. हिंदी विभागप्रमुख पी. एम. पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अनिता देवरे यांनी हिंदी गीत तर माधवी पाटील व वैदेही अहिरे यांनी कबीर दोहे सादर केले. छात्र अध्यापिका स्नेहा सोनवणे, भाग्यश्री माळी, मेहेक मंसूरी, वैष्णवी बागले, मीनाक्षी परदेशी व दिपाली गर्दे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रसंगी प्रा. एच. आर. बडगुजर, प्रा. बी. के. मराठे, प्रा. व्ही. आर. पाटील, प्रा. जे. जी. सोनवणे व सर्व छात्र अध्यापक उपस्थित होते. द्वितीय वर्षाच्या छात्र अध्यापिका पारू भवरे व विद्या चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. रोहित भोये यांनी आभार मानले. -- सिसोदे महाविद्यालयात हिंदी दिवस साजरा धुळे : नरडाणा (ता. शिंदखेडा) येथील ग्रामिण विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. एम. डी. सिसोदे कला, वाणिज्य, डॉ. उषाताई प्रसादराव तनपुरे विज्ञान वरिष्ठ व श्रीमती आर. एम. सिसोदे कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा झाला. या वेळी सिनेमा के विकास मे हिंदी भाषा का स्थान भित्तीपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष संजयकुमार सिसोदे यांनी मनोगतात प्रत्येकाने हिंदीसह मातृभाषा मराठी व इतर भाषांचाही आदर केला पाहिजे असे आवाहन केले. प्राचार्य डॉ. पी. एस. गिरासे यांनी स्वातंत्र्यलढ्यातील हिंदी भाषेचे महत्त्व अधोरेखित केले. उपप्राचार्य डॉ. यू. जी. पाटील, उपप्राचार्य प्रा. ए. आर. वसावे, उपप्राचार्य प्रा. एस. टी. भामरे आणि हिंदी विभाग प्रमुख प्रा. डी. एस. धिवरे उपस्थित होते. प्रा. डॉ. आर. एस. भदाणे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डी. एस. धिवरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. ए. पी. निकम, प्रा. एस. एम. सिसोदे, प्रा. एस. आर. पाटील, प्रा. देवेंद्र पाटील, प्रा. शुभम सांगळे, संजय बोरसे, शैलेंद्र सिसोदे, शंकर सिसोदे यांनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com