पान-३
३६-२
सिंहस्थाची जबाबदारी
घेणारे ती पार पाडतील
भुजबळ ः तयारी नागरिकांच्या जिवावर बेतू नये
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२० : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बैठकीला मला जाता आले नाही, पण सिंहस्थाची जबाबदारी घेतलेले लोक आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पडतील. सर्व कामे वेळेत आणि ठरल्याप्रमाणे चांगली होतील, असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
मंत्री भुजबळ रविवारी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. गंगापूर रस्त्यावरील दुभाजकातील झाडांची कत्तल केल्याप्रकरणी महापालिका आयुक्तांसोबत चर्चा झाली. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे. संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकल्यामुळे हा विषय आता संपल्याचे त्यांनी म्हटले. कुंभमेळ्यासाठी जागा अधिग्रहण केली जात आहे. संपूर्ण कुंभमेळ्यात ३८ हजार कोटी खर्च करण्यात येत असून मागील पैसे दिले पाहिजे. कोणावर अन्याय करता कामा नये. तयारी करताना नागरिकांच्या जिवावर उठता कामा नये, असे आवाहन त्यांनी केले.
…
चौकशीअंती सत्य
दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी तिचे वडील सतीश सॅलियन हे सातत्याने आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करत आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. याविषयी मंत्री भुजबळ म्हणाले, ‘ प्रकरण न्यायप्रविष्ट असून चौकशी करणाऱ्या संस्था सत्य बाहेर आणतील.’
-------------