फोटो -NSK26H30138
नाशिक : जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेच्या वार्षिक सभेत गौरविण्यात आलेले सेवानिवृत्त सभासद व गुणवंत.
जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेला
२ कोटी ३० लाखांचा नफा
----------------------
सेवानिवृत्तांसह गुणवंतांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २० : नाशिक जिल्हा ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, नाशिकची ६६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ग्रामसेवक भवन येथे चेअरमन दत्तात्रय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. सभेत संस्थेला २ कोटी ३० लाख रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचे जाहीर करून सभासदांना ५.११ टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला.
अपघाती निधन झालेल्या सभासद कै. दादा महादू दुकळे व कै. परसराम पावजी पवार यांच्या कायदेशीर वारसांना प्रत्येकी २० लाख रुपयांचे विमा धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. सेवानिवृत्त सभासद व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, तत्काळ कर्जाची मर्यादा ३० हजारांवरून ५० हजार रुपये करून वर्षातून तीन वेळा कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. विषयपत्रिकेवरील १ ते १९ विषयांना सभासदांनी मंजुरी दिली. जलतारा संशोधक प्रा. पुरुषोत्तम वायाळ यांनी जलसंधारणाविषयी मार्गदर्शन केले. संजीव निकम, कैलासचंद्र वाघचौरे, सुचित घरत व उमेशचंद्र चिलबुले यांनी ग्रामपंचायत अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विविध प्रश्नांवर मार्गदर्शन केले. दिल्लीतील आगामी राष्ट्रीय रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. प्रास्ताविक प्रमोद ठाकरे यांनी केले. सूत्रसंचालन संजय गिरी यांनी, तर आभार प्रमोद बोडके यांनी मानले.