गाय व वासराची निर्दयतेने वाहतूक

गाय व वासराची निर्दयतेने वाहतूक
Published on
गायवासराची निर्दयतेने वाहतूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.२० : गायवासराला चारापाण्याची कोणतीही सोय न करता अत्यंत क्रूरपणे व निर्दयतेने कत्तलीच्या उद्देशाने वाहनातून वाहून नेणाऱ्या दोन संशयितांवर येथील रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (ता.१९) सायंकाळी वाघनगर ते जिजाऊनगर रस्त्यावरील हनुमान मंदिरामोरून एक मालवाहतूक करणारे वाहन जात होते. या वाहनात एका गायीची व वासराची मान खाली ओढून त्यांना दोरीने घट्ट बांधून ठेवण्यात आले होते. शिवाय त्यांच्या खाण्या-पिण्याची कोणतीही सोय न करता निर्दयतेने कत्तल करण्याच्या उद्देशाने त्यांची वाहतूक केली जात होती. याबाबत माहिती मिळताच रामानंदनगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी संदीप सोनवणे यांनी सहकाऱ्यांसह कारवाई करीत वाहन अडविले. पाहणीदरम्यान जनावरांची अत्यंत क्रूरपणे वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिस अंमलदार संदीप सोनवणे यांच्या फिर्यादीवरून संशयित तेजस शरद म्हस्के (वय २३, रा. नितीन पाटील गोदामाजवळ, वाघनगर, जळगाव) व शोएब सलीम शेख (वय २७, रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक नीलेश सूर्यवंशी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com