बातमी आजच घ्यावी
------
NSK26H30142
जळगाव : जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळातर्फे रविवारी झालेल्या सत्कार सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांसह मान्यवर.
-----
तेली समाज मंडळातर्फे
चारशे गुणवंतांचा गौरव
-----
मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान सोहळा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २० : येथील जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळातर्फे दहावी, १२वी, पदवी, पदविका व अन्य परीक्षांत उत्तीर्ण ३७५ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ रविवारी (ता.२०) पार पडला. अध्यक्षस्थानी माजी आमदार शिरीष चौधरी होते. आमदार सुरेश भोळे प्रमुख पाहुणे होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करीत अभिवादन करण्यात आले. जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुरेश चौधरी, सचिव नारायण चौधरी, महासभा जिल्हाध्यक्ष सुरेश सिताराम चौधरी, राजेंद्र चौधरी, संतोष चौधरी, वामन चौधरी आदी मान्यवर मंचावर होते. या मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना ऑफिस फोल्डर बॅग, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. जुन्या चालीरीतींना मूठमाती देत आईच्या पार्थिवाला खांदा व मुखाग्नी देऊन उत्तरकार्य विधी पार पाडून सामाजिक धाडस दाखविल्याबद्दल भामरे येथील पूनम विजय चौधरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांमधून कावेरी चौधरी (अमळनेर), भुवनेश्वरी चौधरी व अमृता चौधरी (जळगाव) यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सचिव नारायण चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन लोटन चौधरी व सतीश चौधरी यांनी केले. दुर्गेश चौधरी यांनी आभार मानले.