दोन्‍ही कार्यकाळातील फॉरेंन्‍सिक ऑडिट करा

दोन्‍ही कार्यकाळातील फॉरेंन्‍सिक ऑडिट करा
Published on
मेन फोटो : H30155 दोन्‍ही कार्यकाळातील फॉरेन्सिक ऑडिट करा नीलिमा पवार : मविप्र विद्यापीठ रद्द झाल्याने सभासदांचा विजय सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २० : सध्याच्‍या कार्यकारणीच्‍या कामकाजात पारदर्शकतेचा अभाव आहे. तरीदेखील सभासदांपुढे खोटी माहिती सादर केली जाते. आमच्‍या कार्यकाळातील तसेच सध्याच्‍या कार्यकारणीच्‍या काळातील असे दोन्‍ही वेळचे फॉरेन्सिक ऑडिट करावे, असे आव्‍हान मविप्रच्‍या माजी सरचिटणीस नीलिमा पवार यांनी दिले. मविप्र विद्यापीठ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागणे, हा सभासदांचा विषय असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. मविप्र संस्‍थेच्‍या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर पत्रकार परिषद घेत नीलिमा पवार यांच्‍यासह विरोधी गटाने आरोप केले. याप्रसंगी मविप्रचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, प्रणव पवार, माजी पदाधिकारी दिलीप मोरे, हेमंत वाजे, भाऊसाहेब खताळे, नाना महाले, पंडितराव पिंगळे, सचिन पिंगळे, आर्किटेक्‍ट अमृता पवार आदी उपस्‍थित होते. नीलिमा पवार म्‍हणाल्‍या, की सत्तांतर झाल्‍यानंतर पहिल्‍या वर्षी कार्यकारिणीने १७ कोटी कर्ज फेडल्‍याचा दावा केला असताना, या वर्षी केवळ एकच कोटी का फेडले. आकड्यांची धूळफेक केली जाते आहे. सात हजार नोकऱ्या दिल्‍याची माहिती सभेस दिली असून, हीदेखील खोटी आहे. समाजकार्य महाविद्यालयाचे नॅक मानांकन झालेले नाही. संस्‍थेतील गुणवत्तापूर्ण सेवकांना डावलल्‍याने अनेकांनी नोकऱ्या सोडल्‍या. सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली असली तरी, प्रत्यक्षता अनेक शाखांवरील सेवकांचे वेतन रखडलेले आहे. धोका लक्षात घेता, वारसा सभासदांनी दोनशे व ४ हजार ८०० रुपये रक्‍कमेची पावती प्राप्त करून घेणे आवश्‍यक असून, अन्‍यथा त्‍यांचे सभासदत्‍व कार्यकारिणीकडून कधीही रद्द केला जाऊ शकतो, असा संशय पवार यांनी व्‍यक्‍त केला. वैद्यकीय महाविद्यालयासाठी १ रुपये भाडेतत्त्वावर जागा मिळण्यासाठी आमचीही कार्यकारिणी आग्रही होती. सत्तांतर झाल्‍याने पाठपुरावा करण्याची जबाबदारी सध्याच्‍या कार्यकारणीची होती. सध्याच्‍या कार्यकारिणीने कार्यकाळात अवघे १२ एकर जमीन खरेदी केली असून, यावरून संस्‍थेच्‍या विस्‍तारात रस नसल्‍याचे स्‍पष्ट होते, असा दावा पवार यांनी केला. इतरही मुद्दे मांडायचे होते, परंतु सभेत बोलू दिले नसल्‍याचा, आवाज दाबल्‍याचा आरोप त्‍यांनी केला. पंडितराव पिंगळे म्‍हणाले, की अहवालात दिवंगत अजित पवार यांचे छायाचित्र प्रसिद्ध केले नसून, हा अवमान आहे. प्रणव पवार म्‍हणाले, की होरायझनचे अतिरिक्‍त बांधकाम करत विद्यार्थ्यांचा जीव धोक्‍यात घातला आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील घटत्‍या रुग्‍णसंख्येबाबत डॉ. आत्‍माराम कुंभार्डे यांनी चिंता व्‍यक्‍त केली. ---चौकट अहवालावर चर्चा अपेक्षित होती : ढिकले अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले म्‍हणाले, की सभेत अहवालावर चर्चा होणे अपेक्षित होते. सभा शांततेत पार पाडण्याचे व सर्व सभासदांना मत मांडू देण्याची विनंती सुरुवातीलाच उपस्‍थितांना केली होती. परंतु काहींनी गोंधळ घालत बोलू दिले नसल्‍याचे त्‍यांनी सांगितले. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com