ॲंकर
----------
NSK26H30162
कुऱ्हे पानाचे (ता.भुसावळ) : स्नेहबंध ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्राच्या लोकार्पणप्रसंगी बोलताना वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, व्यासपिठावर मान्यवर.
-----------
ज्येष्ठांच्या चेहऱ्यावरील आनंद महत्त्वाचा
-----
वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे : कुऱ्हे पानाचे येथे विरंगुळा केंद्राचे लोकार्पण
सकाळ वृत्तसेवा
भुसावळ, ता.२१ : आयुष्यभर कुटुंबासाठी, गावासाठी व समाजासाठी झटलेल्या ज्येष्ठांना उतारवयात सन्मान, आपुलकी व मन मोकळे करण्यासाठी हक्काची जागा मिळाली पाहिजे. हे विरंगुळा केंद्र म्हणजे ज्येष्ठांच्या अनुभवाचा सन्मान करणारे, त्यांच्या एकटेपणाला आपुलकीची साथ देणारे व त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारे हक्काचे घर आहे, असे प्रतिपादन वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांनी केले.
तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील स्नेहबंध ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्राच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक रामदास कोतवाल होते.
मंत्री सावकारे पुढे म्हणाले की, याच परिसरात स्पर्धा परीक्षेसाठी जनसुविधेअंतर्गत आधुनिक अभ्यासिका लवकरच मंजूर करणार आहे. ज्येष्ठांचा सन्मान म्हणजे आपल्या संस्कारांचा सन्मान आहे. घरातील आजी-आजोबांचे स्थान कोणीही घेऊ शकत नाही. त्यांच्या अनुभवाची शिदोरी ही पुढील पिढीसाठी अमूल्य आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात ज्येष्ठांना एकमेकांना भेटण्यासाठी, मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी व आनंदाचे क्षण घालवण्यासाठी अशा केंद्रांची गरज आहे. येथे वाचन, भजन-कीर्तन, योग, आरोग्यविषयक मार्गदर्शन, सांस्कृतिक उपक्रम नियमितपणे व्हावेत.
प्रास्ताविक स्नेहबंध ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. टी. टी. यांनी केले. सूत्रसंचालन उपशिक्षक प्रमोद गांधेले यांनी केले. संघाचे सचिव संदीप बारी यांनी आभार मानले. यावेळी एन. के. पाटील, कुऱ्हे येथील कालिदास कळसकर, माजी सरपंच सुरेश शिंदे, रामलाल बडगुजर, गोजोरे येथील शिवाजी पाटील, भागवत टोंगळे, खंडाळा येथील एम. ए. पाटील, डॉ. पवन बारी, दूध डेअरीचे चेअरमन रवींद्र गांधेले, स्नेहबंध ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
-------
किल्ली- ताबापत्र केले सुपुर्द
जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य विश्वनाथ पाटील यांनीही ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. नवनिर्मित ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राची किल्ली व ताबापत्र स्नेहबंध ज्येष्ठ नागरिक संघाकडे मंत्री सावकारे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य समाधान पवार, माजी सरपंच तथा सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे भगवान धांडे यांचा मंत्री सावकारे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.