फोटो H30166
नाशिक : सारडा सर्कल ते मुंबई नाका रस्त्यावर खड्ड्यात रुतलेले बसचे चाक.
-----------
३०-२
काही तासांपूर्वीच झालेल्या
रस्त्यात पुन्हा बस फसली
सारडा सर्कल-मुंबई नाका रस्त्यावरचा प्रकार
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २० : सारडा सर्कलकडून मुंबई नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे रविवारी (ता.२०) सायंकाळी राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे चाक फसल्याने या रस्त्यावरील वाहतूक यंत्रणा कोलमडली होती. विशेषता या रस्त्याचे रविवारीच (ता.२०) सकाळी काम करण्यात आलेले होते. तरीही त्याठिकाणी खड्डा पडून बस फसल्याचा प्रकार घडला. या गलथान कारभाराचा तीव्र नाराजी व्यक्त होते आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता.२०) सायंकाळी सारडा सर्कलमार्गे आलेली राज्य परिवहन महामंडळाची बस मुंबई नाक्याच्या दिशेने जात होती. सारडा सर्कलवर उर्दू हायस्कुलासमोरून जात असतानाच बसचे पुढील चाक अचानक रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात रुतले. त्याठिकाणी बस फसल्याने मागून येणारी वाहतूक अडकून पडली. सारडा सर्कलवर असलेल्या वाहतूक पोलिस अंमलदाराने धाव घेत वाहतूक दुसऱ्या रस्त्याकडे वळविली.
दरम्यान, ज्या ठिकाणी खड्ड्यात बसचे चाक रुतून फसले होते. त्याठिकाणी रविवारीच (ता २०) सकाळी खड्डा बुजविण्याचे काम करण्यात आलेले होते. तरीही त्याच ठिकाणी पुन्हा बस अडकून फसल्याने केलेल्या कामाचा गलथानपणा पुन्हा एकदा उघड झाला. या साऱ्यांचा प्रवाशांसह वाहनचालकांनाही त्रास सहन करावा लागला.
-------------