बौध्द धर्म संमेलन

बौध्द धर्म संमेलन
Published on
NSK26H30099 गुरुदक्षिणा सभागृह : धम्मकाया मिशन राज्यस्तरीय बुद्ध धर्म संमेलनात बोलताना डॉ सुजित बोधी व व्यासपीठावर उपस्थित धम्म काया मिशन राष्ट्रीय अध्यक्ष अँड प्रवीण पंडित, प्रकाश मोरे, सचिन गायकवाड आदी. ---------------- धम्म ही तत्त्वज्ञानाबरोबरच जगण्याची व्यवस्थाही डॉ. सजित बोधी : राज्यस्तरीय बौद्ध धर्म संमेलन उत्साहात सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २०: समाजातील प्रतिव्यवस्थांना छेद देण्यासाठी बुद्ध धम्म प्रचारकांची शाळा उभी करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन नागपूर विद्यापीठाच्या पाली विभागाचे साहाय्यक प्राध्यापक डॉ. सजित बोधी यांनी केले. बुद्धाचा धम्म हा मानवाला थेट निर्वाणापर्यंत नेणारा मार्ग असून ''विनय'' ही प्रत्यक्ष मानवी जगण्याची आचारसंहिता आहे. भगवान बुद्धांनी जगात सर्वप्रथम धम्म प्रचाराची सुरुवात केली असल्याने, हेच चार मुख्य धम्म विचार प्रचारकांपर्यंत पोहोचवणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ------------ धम्मकाया मिशन राज्यस्तरीय बौद्ध धर्म संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. गुरुदक्षिणा सभागृहात (ता.२०) पाचवे संमेलन पार पडले. बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसारामध्ये धम्म प्रचारकांची भूमिका’ विषयावर डॉ बोधी यांनी अभ्यासपूर्ण विचार मांडले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी धम्मकाया मिशनचे राज्याध्यक्ष सचिन गायकवाड होते. मार्गदर्शक म्हणून ॲड. प्रवीण पंडित, प्रकाश मोरे उपस्थित होते. सचिन गायकवाड यांनी, समाज हा धर्माशिवाय जगू शकत नाही. त्यामुळे उपासक हा धर्मप्रचारकाचे चाके आहेत. विचारक्रांती झाल्यावर आचारक्रांती शक्य असल्याचे नमूद केले. महाबोधी मंदिर बौद्ध धर्माचे पवित्र स्थळ असल्याने त्याचे व्यवस्थापन बौद्ध समाजाच्या हाती असावे आणि मंदिरावरील सरकारी व इतर धार्मिक प्रभाव कमी व्हावा, असे धम्मकाया मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रवीण पंडीत यांनी सांगितले. संमेलनाप्रसंगी भन्ते मनोरथ, भन्ते महानाम, भन्ते नागसेन तसेच धम्म चळवळीतील मान्यवर उपस्थित होते. अनिल बागूल यांनी प्रास्ताविक केले. संदीप ससाणे यांनी सूत्रसंचालन केले. प्रमोद नरवाडे यांनी आभार मानले. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com