NSK26H30175
त्र्यंबकेश्वर ः ध्वजासाठीचा लोखंडी खांब
------------
NSK26H30174
त्र्यंबकेश्वर ः कापडी ध्वजपताका
---------------
३०-२
कुंभमेळा ध्वजारोहणाची
त्र्यंबकला जय्यत तयारी
दोन ठिकाणी होणार ध्वजारोहण
त्र्यंबकेश्वर,ता.२० ः कुंभमेळा पर्वाला येत्या ३१ आक्टोबरपासून सुरवात होत असून त्यानिमित्त कुशावर्त तीर्थ आणि नवीन गोदावरी घाटावर ध्वजारोहण होणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी सुरु असल्याची माहिती पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे यांनी दिली.
कुशावर्त तिर्थावर सिमेंटचा स्तंभासाठी पाया उभारण्यात येत असून त्यावर एकतीस फूट उंचीचा लोखंडी ध्वजस्तंभ तयार करण्यात येत असून त्यावर केशरी रंगाचा तीन फुटी उंच व सहा फूट लांबीची कापडी ध्वजपताका लावण्यात येणार आहे. नवीन गोदावरी घाटावर, नवीन कुशावर्त तीर्थावर पंचधातूचा गत कुंभमेळ्यातील ध्वज उभारण्यात येणार आहे. जुन्या कुशावर्त तीर्थावर लोखंडी ध्वज आणून त्याला सिमेंटच्या चौथऱ्यावर बसविण्याचे काम रविवारी (ता.२०) उशिरापर्यंत सुरू होते.
लोखंडी ध्वजस्तंभास चौथऱ्यावर लावण्याचे काम सुरु होते. त्याला नट बोल्टने पक्के करण्यात येणार असून हा ध्वज तीनवेळा उतरवून व पुन्हा रोहन केला जाणार असल्याचे थेटे यांनी सांगितले. कुशावर्त तीर्थावर शंकराचार्य विदुर शंकर भारती यांच्याहस्ते तर नवीन जागेवर राष्ट्रपती मुर्मू यांच्याहस्ते पूजा होणार आहे. या कार्यक्रमात ऐनवेळच्या नियोजनानुसार थोडाफार बदल होऊ शकतो असेही श्री. थेटे यांनी सांगितले.
----------------