टुडे ४ मेन फिचर
---
(फोटोफिचरमधील शेवटचा NSK26H30195 हा फोटो या बातमीत वापरता येईल, फोटो फिचरमध्ये घेतला तरी चालेल)
----
गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला; भाविकांची दर्शनासाठी ओघ
शहरातील गणेश मंडळांच्या आरास, देखावे ठरताहेत आकर्षण; रात्री उशिरापर्यंत रीघ
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.२१ : गणेशोत्सव अंतिम टप्प्यात पोहोचल्याने शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशदर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. सायंकाळनंतर शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठा आणि गणेश मंडळ परिसरात नागरिकांची वर्दळ वाढत असून, रात्री उशिरापर्यंत भाविक गणरायाचे दर्शन घेत आहेत.
शहरातील नवी पेठ, सुभाष चौक, स्टेशन रोड, नेहरू चौक, चित्रा चौक तसेच मुख्य बाजारपेठेतील गणेश मंडळांनी आकर्षक आरास व विविध विषयांवरील देखावे साकारले आहेत. धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक तसेच सामाजिक विषयांवर आधारित देखावे भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. आकर्षक रोषणाई आणि कलात्मक सजावटीमुळे रात्रीच्या वेळी परिसराचे स्वरूप अधिकच खुलून दिसत आहे.
अबालवृद्धांचा उत्साहा
गणेशदर्शनासाठी महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच कुटुंबांसह नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत. अनेक मंडळांच्या आरास पाहण्यासाठी भाविकांच्या रांगा लागत असून, दर्शनानंतर नागरिक देखावे पाहण्यासाठीही गर्दी करत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरही नागरिकांची गर्दी वाढल्याचे चित्र आहे.
गणरायाचा जयघोष
गणेशोत्सवाच्या अंतिम टप्प्यात भाविकांचा उत्साह आणखी वाढला असून, गणरायाच्या जयघोषाने शहरातील गणेश मंडळ परिसर दुमदुमत आहे. आगामी विसर्जन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडूनही आवश्यक तयारी करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सवाच्या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
चौकट
संवेदनशील परिसरात पोलिसांचे लक्ष
वाढती गर्दी लक्षात घेऊन पोलिसांकडून प्रमुख गणेश मंडळे, गर्दीची ठिकाणे आणि संवेदनशील परिसरावर लक्ष ठेवण्यात येत आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसेच गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी पोलिस कर्मचारी आणि स्वयंसेवकांकडून प्रयत्न केले जात आहेत.