बनसोडे यांच्या काव्याच्या केंद्रवर्ती सामान्यांच्या व्यथांचे चिंतन

बनसोडे यांच्या काव्याच्या केंद्रवर्ती सामान्यांच्या व्यथांचे चिंतन
Published on
फोटो : H30204 ‘वेदना, विद्रोह आणि आत्मपरीक्षण’ बनसोडेंच्या कवितेची ताकद रावसाहेब कसबे : ‘अभिवादन पुरस्कार’ सोहळ्यात कार्याला उजाळा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२१ : कवी अशोक बनसोडे यांनी उमेदीच्या काळात साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात लक्षवेधी कार्य केले. त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी सामान्यांच्या वास्तविक व्यथा, वेदना आणि जगण्याचे चिंतन होते, असे ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी सांगितले. कवी बनसोडे यांच्या स्मरणार्थ चित्रकार श्रीधर अंभोरे यांना जाहीर झालेला मरणोत्तर ‘अभिवादन पुरस्कार’ त्यांचे पुत्र महेंद्र अंभोरे यांना प्रदान करण्यात आला, याबद्दलही त्यांनी कौतुक केले. लोकमान्य सभागृहात आयोजित ‘अभिवादन पुरस्कार’ वितरण सोहळ्यात कसबे बोलत होते. प्रमुख पाहुणे प्रा. गंगाधर अहिरे म्हणाले, ‘‘अशोक बनसोडे हे कार्यकर्ते लेखक व कवी होते. ‘आमच्या बापाचा बाप’ या काव्यसंग्रहातून त्यांनी वंचित घटकांच्या जगण्याचे विविध पदर प्रभावीपणे शब्दबद्ध केले. त्यांच्या कवितेत वेदना, विद्रोहासोबतच आत्मपरीक्षणही दिसते.’’ ज्येष्ठ कामगार नेते करुणासागर पगारे अध्यक्षस्थानी होते. त्यांनी कवी बनसोडे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. महेंद्र अंभोरे यांनी रावसाहेब कसबे व मान्यवरांच्या हस्ते श्रीधर अंभोरे यांचा मरणोत्तर पुरस्कार स्वीकारला. रोख पाच हजार रुपये, सन्मानवस्त्र, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. कवी प्रकाश होळकर, काशिनाथ वेलदोडे, प्रकाश घोडके व प्रदीप जाधव यांनी बनसोडे यांच्या कवितांचे वाचन केले. कवी मनीष तपासे, नितीन भुजबळ, ए. पी. बनसोडे व श्याम क्षीरसागर यांनी मनोगते व्यक्त केली. व्याख्याते किशोर शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. शैलेंद्र बनसोडे यांनी आभार मानले. मनोहर अहिरे, राजेश गांगुर्डे, आनंद बनसोडे, चित्रलेखा बनसोडे, शांताराम बागूल, दिनकर पवार व महेंद्र बनसोडे यांनी संयोजन केले. साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांसह बनसोडे कुटुंबीय उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com