आठवड्याच्या पहिल्याच दिवशी
सोन्या-चांदीच्या भावात घसरण
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २१ : सुवर्ण बाजारात मागील आठवड्याच्या शेवटी सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढले होते. मात्र, सोमवारी (ता. २१) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने व चांदीच्या भावात मोठी घसरण झाली. सोने हजार रुपये, तर चांदीचे दर तीन हजार रुपयांनी कमी झाले.
आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेल्या बदलाचा परिणाम सोन्या-चांदीच्या बाजारात होत आहे. यामुळे सुवर्ण बाजारात सातत्याने चढ-उतार सुरूच आहेत. गेल्या आठवड्यात हीच स्थिती होती. मात्र, शेवटच्या तीन दिवसांत भावात वाढ झाल्यानंतर १९ सप्टेंबरला भाव कमी झाले होते. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सोने व चांदीचे भाव कमी झाले असून, सोने हजाराने, तर चांदी तीन हजार रुपयांनी स्वस्त झाली. शनिवारी (ता. १९) सोन्याचा भाव एक लाख ५३ हजार रुपयांवर (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) होता. त्यात सोमवारी हजार रुपयांची घसरण होऊन सोने एक लाख ५२ हजार रुपयांवर आले, तर चांदी तीन हजार रुपयांनी स्वस्त झाली. चांदीचे भाव दोन लाख ४१ हजार (प्रतिकिलो विनाजीएसटी) रुपयांवरून दोन लाख ३८ हजार रुपयांवर आले आहेत.
चौकट
सोन्या-चांदीचे भाव (विनाजीएसटी)
तारीख--- सोने (प्रतिदहा ग्रॅम)--- चांदी (प्रतिकिलो)
१६ सप्टेंबर--- १ लाख ५१ हजार ५००--- २ लाख ३४ हजार
१७ सप्टेंबर--- १ लाख ५० हजार ५००--- २ लाख ३२ हजार
१८ सप्टेंबर--- १ लाख ५२ हजार ५००--- २ लाख ४१ हजार
१९ सप्टेंबर--- १ लाख ५३ हजार--- २ लाख ४१ हजार
२१ सप्टेंबर--- १ लाख ५२ हजार--- २ लाख ३८ हजार