धुळे : टुडे पान ३ साठी...मेन
--
फोटो क्रमांक : 30210, 30211
दहिवेल : मातोश्री ग्रुप गणेशोत्सव मंडळाची आकर्षक मूर्ती. दुसऱ्या छायाचित्रात मंडळातर्फे साकारण्यात आलेल्या महाकाल मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी भाविकांची झालेली गर्दी. (छायाचित्रे : विनायक पाटील, आमळी)
--
गणेशोत्सवात दहिवेलमध्ये अवतरले महाकाल मंदिर
--
मातोश्री ग्रुपतर्फे ७० फुटांची हुबेहूब प्रतिकृती; भाविकांची गर्दी, दहिवेलला यात्रेचे स्वरूप
सकाळ वृत्तसेवा
आमळी, ता. २१ : दहिवेल (ता. साक्री) येथील मातोश्री ग्रुप प्रणित सार्वजनिक गणेश मंडळाने यंदा गणेशोत्सवासाठी मध्यप्रदेशातील उज्जैन येथील प्रसिद्ध महाकाल मंदिराची ७० फूट उंच व ६० फूट रुंद भव्य प्रतिकृती साकारली आहे. दोन एकर जागेवर उभारण्यात आलेला हा देखणा देखावा पाहण्यासाठी धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातून भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
-
दहिवेल ग्रामपंचायत कार्यालयाजवळ, सोसायटी कार्यालयाच्या मैदानावर हा गणेशोत्सव साजरा होत आहे. या ठिकाणी २५ बाय ५० फुटाचा मंडप उभारण्यात आला असून मंदिराची वास्तुरचना, नक्षीकाम, शिखरांची रचना आणि रात्रीची आकर्षक विद्युत रोषणाई भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. या देखाव्यात महादेव, नंदी, त्रिशूळ, बारा ज्योतिर्लिंगे आणि महाकाल यांच्या आकर्षक मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आल्या आहेत. मातोश्री ग्रुपचे हे सातवे वर्ष आहे. संस्थापक अध्यक्ष अमोल सोनवणे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंद महाजन, उपाध्यक्ष सुनील सूर्यवंशी आणि एस. के. इव्हेंट निर्जला मंडप डेकोरेशनचे संचालक एस. के. बच्छाव यांच्या संकल्पनेनुसार पश्चिम बंगालमधील कोलकाता हावडा येथील गोपाल तिवारी व दिव्यांग कलाकार धनंजय मंडल यांच्या १५ सहकाऱ्यांनी थर्माकोल, बांबू, प्लायवूड आणि कापड यांचा वापर करून ही प्रतिकृती हुबेहूब साकारली आहे.
-
१४-१
..चौकट..
१४-१
दहिवेलला यात्रेचे स्वरूप
नागरिकांना देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांची ओळख व्हावी, या उद्देशाने मंडळ दरवर्षी असे देखावे उभारते. त्यासोबतच नेत्र तपासणी, निराधार महिलांना शिलाई वाटप, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, रक्तदान शिबिर आणि शेतकऱ्यांना स्प्रे पंप व ताडपत्री वाटप यांसारखे सामाजिक उपक्रम वर्षभर राबवले जातात. परिसरात विविध पाळणे व दुकाने आल्यामुळे दहिवेलला यात्रेचे स्वरूप आले आहे. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी बुधवारी (ता. २३) रात्री हरियाणा व इंदूर येथील कलाकारांकडून विविध देखावे सादर केले जाणार आहेत.
-
कोट
मातोश्री गणेश मंडळाचे यंदा सातवे वर्ष आहे. प्रत्येक वर्षी गणेश भक्तांना काहीतरी नवीन व भव्य देण्याचा आमचा प्रयत्न असतो. अनेकांना दुसऱ्या राज्यात जाऊन दर्शन घेता येत नाही. हीच गोष्ट लक्षात घेऊन आम्ही यंदा मध्यप्रदेशातील उज्जैन येथील महाकाल मंदिराचा ७० फुट उंच मंदिराचा देखावा पश्चिम बंगालमधील पंधरा कारागिराने अहोरात्र मेहनत घेत उभा केला आहे. सर्व गणेश भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा.
- अमोल सोनवणे, संस्थापक अध्यक्ष, मातोश्री ग्रुप गणेश मंडळ, दहिवेल