शिक्षक संघाचे निवेदन

शिक्षक संघाचे निवेदन
Published on
धुळे : टुडे पान ३ साठी... -- फोटो क्रमांक : 30213 साक्री : निवृत्त शिक्षकांचे प्रलंबित अंशराशी आणि उपदान तातडीने अदा करण्यात यावे या मागणीचे निवेदन बीडीओ शशिकांत सोनवणे यांना देताना निवृत्त शिक्षक संघाचे पदाधिकारी. -- निवृत्त शिक्षकांचे उपदान त्वरित द्या -- साक्रीत निवृत्त शिक्षक संघाचे निवेदन सकाळ वृत्तसेवा साक्री, ता. २१ : ३१ मे २०२६ ला निवृत्त झालेल्या मुख्याध्यापक व शिक्षकांचे प्रलंबित अंशराशी आणि उपदान तातडीने अदा करण्यात यावे, अशी आग्रही मागणी साक्री तालुका निवृत्त प्राथमिक शिक्षक सेवा संघाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात संघाच्या पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे यांना निवेदन दिले. - निवृत्त शिक्षकांनी संपूर्ण सेवाकाळात प्रामाणिकपणे व निष्ठेने कर्तव्य बजावले आहे. निवृत्तीनंतर मिळणारी अंशराशी आणि उपदानाची रक्कम ही त्यांच्या पुढील आयुष्यातील आर्थिक नियोजन, आरोग्य आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असते. मात्र, निवृत्तीला महिने उलटूनही संबंधित रक्कम अद्याप खात्यावर जमा झालेली नाही. प्रशासकीय दिरंगाईमुळे निवृत्त शिक्षकांना मोठ्या आर्थिक अडचणींचा आणि मानसिक त्रासाचा सामना करावा लागत आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्काची थकीत प्रकरणे विनाविलंब निकाली काढून त्यांची देय रक्कम तत्काळ अदा करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. प्रशासनाने या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न घेतल्यास पुढील मार्ग स्वीकारण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला. निवेदनावर निवृत्त प्राथमिक शिक्षक सेवा संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यवाह, कोषाध्यक्ष आणि तालुका कार्यकारिणीतील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com