दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणनेच्या प्रशिक्षणास प्रारंभ

दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणनेच्या प्रशिक्षणास प्रारंभ
Published on
अँकर --- NSK26H30218 नंदुरबार : प्रशिक्षणात बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी. शेजारी अजय ठाकूर, श्रीकांत बनकर, रमेश वळवी. ---- दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणनेच्या प्रशिक्षणास प्रारंभ नंदुरबार जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करावी ः आशा संघवी सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. २१ ः जनगणना- २०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणनेच्या प्रशिक्षणास प्रारंभ झाला आहे. चार्ज अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणात सहभाग नोंदविला. प्रशिक्षणादरम्यान प्रक्रियेची माहिती समजून घेतल्यास पुढील टप्प्यातील कामकाजात अडचणी येणार नाहीत. जनगणनेचे काम अधिक प्रभावीपणे पूर्ण करता येईल, असे प्रतिपादन जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांनी या वेळी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीर बिरसा मुंडा सभागृहात या प्रशिक्षणास प्रारंभ झाला आहे. या वेळी जनगणना कार्य संचालनालय, मुंबईचे सहायक संचालक अजय ठाकूर, एसआय जीआर-२ श्रीकांत बनकर, नायब तहसीलदार रमेश वळवी, चार्ज अधिकारी तथा तहसीलदार, मुख्याधिकारी, जनगणना कर्मचारी उपस्थित होते. फेब्रुवारपासून होणार सुरुवात निवासी उपजिल्हाधिकारी संघवी म्हणाल्या, की जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील घरांची यादी व घरगणना प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यापासून प्रत्यक्ष लोकसंख्या गणनेस सुरुवात होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्या गणना करण्यात येणार आहे. आवश्यक पूर्वतयारी म्हणून इन्युमरेशन ब्लॉकची निर्मिती व संक्षिप्त गृहसूची तयार करण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या टप्प्यातही नंदुरबार जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करून राज्यात अग्रस्थानी यावे, असे त्यांनी सांगितले. जनगणनेसाठी ४० प्रश्‍न सहायक संचालक ठाकूर यांनी सांगितले, की जनगणना-२०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील कामकाजात अचूकता आणि काटेकोरपणा महत्त्वाचा आहे. ज्या इन्युमरेशन ब्लॉकमध्ये लोकसंख्या ८०० पेक्षा अधिक आहे, अशा ब्लॉकची आवश्यकतेनुसार पुनर्रचना करण्याची कार्यवाही प्राधान्याने करावी. यासाठी उपलब्ध पीपीटी, परिपत्रके, तसेच जनगणना कार्य संचालनालयाने तयार केलेल्या प्रशिक्षणपर व्हिडिओचा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपयोग करावा. प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीची स्वतंत्र माहिती संकलित करण्यात येणार असून, त्यासाठी ४० प्रश्नांची माहिती घेण्यात येणार आहे. चार्ज अधिकाऱ्यांनी संपूर्ण कामकाजावर प्रभावी नियंत्रण व देखरेख ठेवणे आवश्यक आहे. जनगणनेची माहिती गोपनीय असून, ती माहिती अनधिकृत व्यक्तीला देऊ नये. पहिल्या टप्प्यातील कामकाजातील अनुभव व त्रुटी लक्षात घेऊन दुसऱ्या टप्प्यात सर्वांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी श्रीकांत बनकर यांनी प्रगणक तयार करण्याची सर्वसाधारण तत्त्वे, प्रगणक गट तयार करण्याची पद्धत, मांडणीदर्शक नकाशाचे पुनरावलोकन, गणना घराची निवड व वाटप, संक्षिप्त गृहसूची, तसेच इन्युमरेशन ब्लॉकची अचूक निर्मिती व नोंदणी करण्याच्या पद्धतीबाबत पीपीटीद्वारे मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com