नेशन बिल्डर ॲवॉर्ड

नेशन बिल्डर ॲवॉर्ड
Published on
धुळे टुडे २ साठी अँकर... --- फोटो-NSK26H30219 धुळे : रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉसरोडतर्फे नेशन बिल्डर ॲवॉर्डने सन्मानित शिक्षकांसह मान्यवर. --- शिक्षकांचा नेशन बिल्डर ॲवॉर्डने सन्मान --- रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉसरोडचा उपक्रम; २७ शिक्षकांना पुरस्कार सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २१ : विद्यार्थ्यांना घडविण्याचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या कार्याची दखल घेत रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉसरोडतर्फे दरवर्षीप्रमाणे रोटरी डिस्ट्रिक्ट ३०६० च्या सहकार्याने यंदाही ‘नेशन बिल्डर ॲवॉर्ड-२०२६’ ने २७ शिक्षकांचा गौरव करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळा नुकताच शहरातील दाते रिजेन्सी येथे झाला. एसएससी बोर्डाचे चेअरमन डॉ. सुभाष बोरसे, कृषीभूषण प्रकाश पाटील प्रमुख पाहुणे होते. त्यांच्या हस्ते प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व प्राध्यापक अशा एकूण २७ मान्यवरांचा नेशन बिल्डर ॲवॉर्ड- २०२६ ने सन्मान करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉसरोडचे अध्यक्ष हेरंब दाते यांनी प्रास्ताविकातून शिक्षकांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करत समाज घडविण्यामध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. प्रा. रवींद्र सांगळे व रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर दीपक अहिरे यांनी सूत्रसंचालन केले. कल्पना अहिरे, दिनेश खंडीकर, दिनेश कुँवर, पुष्कर अलाई, चेतन धामेचा, निखिल माने, प्रमोद शेलार, राकेश जैन, मुक्ता दाते, मोनाली थोरात यांच्यासह रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. पुरस्कारप्राप्त मान्यवर भगवान वासुदेव जोशी, राजेंद्र यशवंत पाटील, जयश्री अविनाश पवार, दीपक केशव शिरुडकर, प्रशांत गजानन सोनजे, कमलाकर नामदेव बच्छाव, विलास शामराव महाले, नदीम खान गुलशेर खान, युवराज दौलत ईशी, संगीता नागराज पाटील, सदेका बानो अब्दुल हलीम, संजय डांगळ पाटील, इनामदार मोहम्मद अयाज अब्दुल बारी, धनश्री उमेश मुधोळकर, युवराज देवचंद नाईक, अविनाश काशिनाथ पाटील, भारती अतुल सोनवणे, विजयकुमार मधुकर सोनवणे, स्वप्निल शिवाजीराव पवार, अरुणा राजेंद्र सोनवणे, संजय काशिनाथ वसईकर, शीतल जवाहर पाटील, प्रवीण रमेश खैरनार, डॉ. भूपेंद्र रामदास माळपुरे, डॉ. सतीश उत्तमराव पाटील, डॉ. दिलीप जंकीराम घोंगडे, डॉ. दत्ता आसाराम ढाले. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com