NSK26H30237
नंदुरबार : दामिनी पथकाच्या ज्योती पाटील यांचा सत्कार करताना विकास अजगे, अदिती राजवंशी, सुनीता गावित, प्रा. डॉ. मधुकर देसले व कर्मचारीवर्ग.
-------------
‘व्यसन सोडा, जीवन घडवा’चा तरुणांना संदेश
ज्योती पाटील यांचे मार्गदर्शन, आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रात कार्यशाळा
नंदुरबार, ता. २१ : भाग्यचैतन्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचालित आनंदवन व्यसनमुक्ती उपचार, मार्गदर्शन व पुनर्वसन केंद्रात गणेशोत्सवानिमित्त व्यसनमुक्ती विषयक कार्यशाळा घेण्यात आली. दामिनी पथकाच्या ज्योती पाटील यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले.
प्रमुख पाहुणे म्हणून विकास अजगे, आदिती राजवंशी आणि सुनीता गावित उपस्थित होते. ज्योती पाटील यांनी युवकांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करत, आधुनिक जीवनशैली, चंगळवाद व ताणतणावामुळे वाढणाऱ्या व्यसनाधीनतेबाबत मार्गदर्शन केले. ‘व्यसन सोडा, जीवन घडवा’ हा संदेश देत त्यांनी ध्येयपूर्तीसाठी मेहनत, शिस्त आणि समाजसुधारकांच्या विचारांचे आचरण करण्यावर भर दिला. व्यसनाला नकार देऊन आणि सुखी आयुष्याला होकार द्यावा. आपले भविष्य उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करावा, असा संदेश ज्योती पाटील यांनी आपल्या भाषणातून दिला.
कार्यशाळेत व्यसनमुक्ती केंद्रातील लाभार्थ्यांनी स्वतःच्या आयुष्यातील अनुभव व व्यसनामुळे झालेल्या सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक नुकसानीची व्यथा मांडली. भविष्यात नवे जीवन घडविण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समुपदेशक अर्चना बागूल यांनी केले. समन्वयक शीतल नुकते यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक सुभाष कोकणी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. डॉ. मधुकर देसले, लक्ष्मण बागूल, जयपाल वळवी, कल्पना वळवी, नितीन सनेर, मधू सोनेरी, तेजस देसले, विजय पाटील, विशाल दराडे, मीनाक्षी देसले आदींनी सहकार्य केले.