NSK26H30242
जळगाव : रोटरी जळगाव वेस्टतर्फे आयोजित व्याख्यानात बोलताना ओंकार दाभाडकर.
---
चुकीच्या पालकत्वामुळे तणाव सहन न करणारी पिढी
(उपशीर्षक)
ओंकार दाभाडकर : रोटरी वेस्टतर्फे ''काय ही आजकालची मुलं''वर व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २१ : नवीन पिढी अर्थात जेन- झीचे पालकत्व अवघड आहे, पण अशक्य नाही. चुकीच्या पालकत्वामुळे तणाव सहन न करू शकणारी नाजूक पिढी घडली आहे, असे युवा वक्ते मानसशास्त्र अभ्यासक व इन्स्फुएन्सर ओंकार दाभाडकर (डोंबिवली) यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे ''काय ही आजकालची मुलं!'' या विषयावर मायादेवीनगरातील रोटरी भवन येथे जाहीर व्याख्यानाचे आयोजन केले होते. यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्ष योगेश राका, मानद सचिव बिपिन काबरा, पब्लिक मीटिंग कमिटी चेअरमन चेतन गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती.
दाभाडकर यांनी दोन पिढ्यांमध्ये फरक खूप मोठा आहे ही समस्या आहे. मात्र चर्चा नव्हे तर त्यावर उपाय शोधणे गरजेचे आहे. सॉफ्ट पेरंटिंगच्या नावाने होणारे लाड टोकाला गेले आहेत. पालक मुलांमध्ये स्वतःचे जीवन पाहत असतात. दुसरीकडे बिझी आहे, म्हणून वेळ नाही अशी सबब सांगतात.
चौकट
ते तुझ्या भविष्यासाठी...
तुला आवडत नाही, तर तू करू नको, मुलांना प्रेमाने हसत खेळत समजून सांगावे; यापेक्षा मी सांगतो आहे. ते तुझ्या भविष्यासाठी तुला करावेच लागेल, असे पालकांनी सांगण्याची गरज आहे असेही ते म्हणाले.