जलसंधारण योजनांच्या जलाशयात गणेशमूर्ती विसर्जित करू नये

जलसंधारण योजनांच्या जलाशयात गणेशमूर्ती विसर्जित करू नये
Published on
जलसंधारण योजनांच्या जलाशयात गणेशमूर्ती विसर्जनास बंदी ः वानरे नंदुरबार, ता. २१ : एल निनोच्या प्रभावामुळे जिल्ह्यात या वर्षी पाऊस कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे परिसरातील जलसंधारण योजनांमधील पाण्याचा वापर प्रामुख्याने गाव व शहरांसाठी पिण्याचे पाणी, शेती सिंचन, तसेच पशुधनासाठी करण्यात येत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या सांगतेवेळी जलाशय, सिंचन तलाव, साठवण तलाव, पाझर तलाव, गाव तलाव, तसेच कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये गणेशमूर्ती व निर्माल्य विसर्जन करून जलप्रदूषण होणार नाही याची नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन वानरे यांनी केले आहे. गणेशमूर्ती व निर्माल्य विसर्जनामुळे जलप्रदूषण होऊन नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच धरण व जलाशय परिसरातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने विसर्जनाच्या वेळी जीवितहानीच्या घटना घडण्याची शक्यता असून, नागरिकांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो. मृद व जलसंधारण विभागामार्फत १७ ऑक्टोबरपर्यंत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. तसेच २६ जानेवारी २०२७ पर्यंत जलसंधारण अभियान राबविण्यात येत आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, समृद्ध महाराष्ट्र घडवा’ हा संदेश देण्यात येत आहे. जलाशयातील जलप्रदूषण टाळणे, पर्यावरणाचे संवर्धन करणे, तसेच नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने जलसंधारण योजनांच्या जलाशयांमध्ये व धरणांमध्ये गणेशमूर्ती व निर्माल्य विसर्जन करण्यास प्रतिबंध करण्याबाबत नागरिकांनी सहकार्य करावे. धरण परिसरातील शहरे व गावांमध्ये स्थानिक प्रशासन, तसेच ग्रामपंचायतींच्या स्तरावर दवंडी व अन्य माध्यमांतून जनजागृती करण्यात यावी. जलप्रदूषण व पर्यावरणाच्या संवर्धनासाठी नागरिकांनी गणेशमूर्ती विसर्जनासाठी स्थानिक प्रशासनाने सूचित केलेल्या अधिकृत ठिकाणीच विसर्जन करावे, असे आवाहन मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता वानरे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com