धुळे शाळा हजेरी शून्य

धुळे शाळा हजेरी शून्य
Published on
धुळे ः टुडे १ साठी, टॉपला मेन................(नंदुरबार टुडेलाही शक्य) -- फोटो : गरजेनुसार समर्पक लोगो छायाचित्र घेणे... -- अडीच हजारांवर शाळांची हजेरी ‘शून्य’! - धुळे- नंदुरबारची ऑनलाइन स्थिती; यंदाच्या सत्रात उपस्थिती नोंद नाही - सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २१ : शाळा सुरू होऊन विद्यार्थ्यांची हजेरी नोंदविणे हा दैनंदिन शैक्षणिक कामकाजाचा महत्त्वाचा भाग असताना धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील तब्बल दोन हजार ७६७ शाळांची ऑनलाइन हजेरी यंदाच्या शैक्षणिक सत्रात एकदाही नोंदविली गेलेली नाही. यामध्ये धुळे जिल्ह्यातील एक हजार २२३, तर नंदुरबार जिल्ह्यातील एक हजार ५४४ शाळांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती नोंदविण्याच्या प्रक्रियेत ही स्थिती शिक्षण विभागाच्या यंत्रणेसमोर गंभीर प्रश्न निर्माण करणारी आहे. - विद्या समीक्षा केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती नोंदविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती नियमित नोंदविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. - धुळ्यात १२२३ शाळा धुळे जिल्ह्यात ऑनलाइन हजेरी नोंदविलेली नसलेल्या एक हजार २२३ शाळा आहेत. यामध्ये धुळे शहरासह धुळे तालुका, शिरपूर, शिंदखेडा आणि साक्री तालुक्यातील शाळांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील शाळांबरोबरच शहरातील शाळांचाही ऑनलाइन हजेरी नोंदणी प्रक्रियेत सहभाग अपेक्षित असताना मोठ्या संख्येने शाळांची नोंद शून्य राहिल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. - नंदुरबारला १५४४ शाळा नंदुरबार जिल्ह्यात ही संख्या आणखी मोठी आहे. जिल्ह्यातील सुमारे एक हजार ५४४ शाळांनी यंदाच्या सत्रात एकदाही ऑनलाइन विद्यार्थ्यांची हजेरी नोंदविलेली नाही. नंदुरबार शहर व तालुक्यासह शहादा, नवापूर, अक्कलकुवा, तळोदा आणि धडगाव तालुक्यांतील शाळांचा यात समावेश आहे. आदिवासीबहुल व दुर्गम भागातील शाळांमध्ये ऑनलाइन नोंदणीची तांत्रिक सुविधा, नियमित इंटरनेट उपलब्धता आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यांचा स्वतंत्रपणे आढावा घेण्याची गरज या निमित्ताने पुढे आली आहे. - शोध घेण्याची गरज धुळे, नंदुरबार आणि जळगाव या खानदेशातील तीन जिल्ह्यांचा विचार करता ऑनलाइन हजेरी नोंदविलेली नसलेल्या शाळांची संख्या चार हजार ५१४ आहे. ऑनलाइन हजेरी ही केवळ प्रशासकीय नोंद न राहता विद्यार्थ्यांची उपस्थिती, शाळेतील नियमितता आणि शैक्षणिक व्यवस्थेचे संनियंत्रण करण्यासाठी महत्त्वाची ठरत आहे. त्यामुळे हजेरी नोंदविली नसलेल्या शाळांची कारणमीमांसा करणे आवश्यक आहे. विशेषतः दुर्गम व आदिवासी भागातील इंटरनेट सुविधा, तांत्रिक अडचणी, प्रणालीचा वापर आणि शाळास्तरावरील अंमलबजावणी यांचा स्वतंत्र आढावा घेतल्यास या आकडेवारीमागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकते. संबंधित शिक्षण यंत्रणेने शाळानिहाय पडताळणी करून नियमित ऑनलाइन हजेरी नोंदणी सुरू करण्यावर भर देणे अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com