शहर टुडे पान चारसाठी
-------------------
(सूचना : गर्दी असल्याने फोटो तीन कॉलम वापरावा)
NSK26H30254
जळगाव : श्रीसंत नामदेव महाराज आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांसह मान्यवर.
-----------------------
श्रीसंत नामदेव महाराज आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
-----
शहरातील १६ शिक्षकांचा गौरव; क्षत्रिय अहीर शिंपी समाज संस्थेचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.२१ : येथील श्री क्षत्रिय अहीर शिंपी समाज हितवर्धक संस्था संचलित लक्ष्मीनगर-तुकारामवाडी शाखेच्या वतीने श्रीसंत नामदेव महाराज आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ प्रदान सोहळा रविवारी (ता.२०) मनोरमा जगताप सामाजिक सभागृहात झाला. अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष विवेक जगताप होते. यात विविध क्षेत्रांत कार्यरत १६ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
सुरुवातीला संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. शाखाध्यक्ष तथा प्रकल्पप्रमुख महेश शिंपी यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे कॅप्टन डॉ. योगेश बोरसे, नीलाक्षी निकुंभ, डॉ. मनीषा जगताप व सुभद्रा बाविस्कर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष शरद बिरार, संजय बोरसे, उत्कर्ष संस्थेचे पदाधिकारी मनोज भांडारकर, दिलीप सोनवणे, अनिल खैरनार, चेतन खैरनार, गणेश सोनवणे, महिला अध्यक्षा माधुरी शिंपी, युवक अध्यक्ष हेमंत शिंपी आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी हितवर्धक संस्थेचे कार्यकारी मंडळ, युवा मंडळ व महिला मंडळाने सहकार्य केले. सूत्रसंचालन कार्याध्यक्ष मनोज भांडारकर यांनी केले. कोषाध्यक्ष चेतन खैरनार यांनी आभार मानले.
------------
सन्मानीत झालेले शिक्षक
भारती सोनवणे, प्रियंका शिंपी, अश्विनी शिंपी, स्नेहा सोनवणे, वैशाली भांडारकर, पल्लवी शिंपी, नरेंद्र मांडगे, अंकिता शिंपी, श्रीकांत निकुंभ, पूजा बागुल, दीपक शिंपी, अश्विनी खैरनार, राकेश शिंपी, प्रशांत गांगुर्डे, अनुप कापडे व मनीषा सोनवणे यांना संत नामदेव महाराज यांची प्रतिमा, सन्मानपत्र व गमछा देऊन आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.