ऊर्जा प्रबोधन मोहीम

ऊर्जा प्रबोधन मोहीम
Published on
धुळे टुडे २ साठी... --- गणेशोत्सवात ऊर्जा प्रबोधन महामोहीम --- महावितरणतर्फे शाळा- महाविद्यालयांत वीज बचत व सुरक्षेचा जागर सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २१ : गणेशोत्सवात महावितरणतर्फे ऊर्जा प्रबोधन मोहीम हाती घेण्यात आली आहे. हरित ऊर्जा आण विद्युत सुरक्षेच्या माध्यमातून ऊर्जा स्वातंत्र्याकडे वाटचाल या ध्येयाने १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान ही मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘अभियंता दिना’चे औचित्य साधून महावितरणचे शेकडो अभियंते शाळा- महाविद्यालयामध्ये हरित ऊर्जा, वीज बचत व सुरक्षेचा जागर करत आहेत. महावितरणच्या मानव संसाधन विभागाचे संचालक राजेंद्र पवार व कार्यकारी संचालक परेश भागवत यांच्या संकल्पनेतून राज्यभर हा उपक्रम राबवण्यात येत आहे. मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या नेतृत्वाखाली जळगाव परिमंडलांतर्गत जळगाव, धुळे व नंदुरबार मंडलांत कार्यकारी अभियंत्यांपासून ते कनिष्ठ अभियंत्यांपर्यंतची संपूर्ण टीम शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना हरित ऊर्जा, वीज बचत आणि सुरक्षिततेचे मोलाचे धडे देत आहे. मागील आठवड्यात धुळे जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रबोधन सत्र झाले. योजनांचीही माहिती विद्यार्थी व नागरिकांना सक्षम बनवण्यासाठी महावितरणतर्फे पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना, स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (स्मार्ट) योजना, ई- व्हेईकल धोरण, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, सौर कृषी पंप आणि ‘गो ग्रीन’ यांसारख्या महत्त्वपूर्ण शासकीय योजनांची माहिती दिली जात आहे. सोबतच दैनंदिन आयुष्यात वीज अपघातांना आळा घालण्यासाठी घ्यावयाची खबरदारी आणि उपायांवरही मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच, पारंपरिक ऊर्जा स्रोतांवरील ताण लक्षात घेऊन सौर व पवन ऊर्जेच्या वापराविषयी जागृती करण्यात येत आहे. सोलर पॅनलसह विद्युत बचत व सुरक्षा यांची सोप्या भाषेत माहिती देण्यात येत आहे. गरज नसताना पंखे, दिवे बंद ठेवावेत, एलईडी दिवे, तसेच स्टार रेटिंग असलेल्या उपकरणांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. मंडळांनाही आवाहन केवळ शाळा- महाविद्यालयेच नव्हे तर प्रमुख गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातूनही ही जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. उत्सवासाठी केवळ अधिकृत वीज जोडणीचाच वापर करावा, सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणारे ईएलसीबी (अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर) उपकरण अनिवार्यपणे लावावे, ऊर्जेची बचत करण्यासाठी देखाव्यांमध्ये एलईडी दिव्यांचा जास्तीत जास्त वापर करावा आणि हरित ऊर्जेचा संदेश देणारे प्रबोधनात्मक देखावे उभारावेत, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com