धुळे टुडे १ संक्षीप्त

धुळे टुडे १ संक्षीप्त
Published on
धुळे ः टुडे १ साठी, संक्षीप्त -- जमावाकडून मारहाण; वाहनांची तोडफोड धुळे : ऑटोरिक्षा हटविण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान जमावाकडून मारहाण व वाहनांच्या तोडफोडीत झाले. जयशंकर कॉलनी परिसरात बॅटरी व्यावसायिक मलीक साजीद जैश मोहम्मद यांना लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. तसेच तीन वाहनांच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले. मलीक यांच्या फिर्यादीनुसार १२ मेस रात्री साडेनऊच्या सुमारास ऑटोरिक्षा येथून काढण्याच्या कारणावरून एकलाख अन्सारी ऊर्फ एकलाख पहेलवान, इल्ली अन्सारी ऊर्फ इल्ली पहेलवान, मजिद अन्सारी, सरफराज अन्सारी ऊर्फ सरफराज कलेजीवाला, बबलू अन्सारी ऊर्फ बबलू मोबाईलवाला, जुबेर अन्सारी ऊर्फ जुबेर बिल्डर व शाहीद अन्सारी ऊर्फ शाहीद वायरमन यांच्यासह २५ ते ३० जणांनी जमाव केला. त्यांनी शिवीगाळ व दमदाटी करून मलीक यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. जमावाने गल्लीतील दुचाकी (एमएच १८ एडी ९५८४), कार (एमएच २९ बीपी १११९) व पिक-अप (एमएच ४१ एयू २२४३) यांच्या काचा फोडल्या. याशिवाय हाशीम शेख यांच्या घरासमोरील १२ लोखंडी पाइपही नेले. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला. - बंद घरात चोरी; मंगलपोत लंपास धुळे : मोराणे (ता. धुळे) येथे बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी १५ हजारांची रोकड व एक तोळे सोन्याची मंगलपोत, असा मुद्देमाल नेला. ही घटना रविवारी (ता. १३) सायंकाळी घडली. आश्विनी भगवान चित्ते या मोलमजुरी करून दोन मुलांचा सांभाळ करतात. त्या रविवारी सायंकाळी धुळे येथे आईकडे मुक्कामी गेल्या होत्या. ही संधी साधून संशयितांनी घराचा कडी-कोयंडा तोडून लोखंडी कपाटातील रोकड व प्लास्टिक बॉक्समधील सोन्याची मंगलपोत लंपास केली. - अल्पवयीन मुलीसह तरुणी बेपत्ता धुळे : शहर व मोहाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तरुणींचे अपहरण झाल्याच्या दोन स्वतंत्र घटना घडल्या. नकाणे (ता. धुळे) येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला १५ सप्टेंबरला दुपारी एकच्या सुमारास अकबर चौक परिसरातून आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दुसऱ्या घटनेत मोहाडी उपनगरातील टिकूभाऊनगर येथून २३ वर्षीय तरुणीला १६ सप्टेंबरला रात्री आठच्या सुमारास तिच्या घरातून संशयिताने पळवून नेले. याप्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com