दहा तलवारींसह गुन्हेगार गजाआड

दहा तलवारींसह गुन्हेगार गजाआड
Published on
धुळे ः टुडे १ साठी -- फोटो क्रमांक ः 30263 धुळे : पोलिस अधीक्षक कार्यालयात तलवारी बाळगणाऱ्या संशयिताच्या चौकशीवेळी उपस्थित अधिकारी. -- दहा तलवारींसह गुन्हेगार गजाआड - ‘एलसीबी’कडून सव्वापाच लाखांचा मुद्देमाल जप्त सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २१ : आपापसातील अंतर्गत वादातून शस्त्रांचा वापर करण्याच्या उद्देशाने दहा तलवारींची वाहतूक करणाऱ्या दोंडाईचा (ता. शिंदखेडा) येथील दोघांना एलसीबी शाखेने सापळा रचून गजाआड केले. दोंडाईचा- शहादा रस्त्यावरील रामी फाट्याजवळील पीरबल्ली परिसरात केलेल्या कारवाईत एकूण पाच लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय येनपुरे व पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी जिल्ह्यातील अवैध शस्त्रांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सापळा रचला. यात भूषण माधवराव गवळे (रा. गोपालपुरा, कृष्ण मंदिराजवळ, दोंडाईचा) आणि आकाश प्रकाश ईशी (रा. गुरव स्टॉप, दोंडाईचा) याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सोनेरी मूठ असलेल्या पांढऱ्या धातूच्या ३० हजारांच्या दहा तलवारी आणि पाच लाखाची कार (जीजे ०६ जेक्यू १२०६) जप्त केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार संशयितांनी आपापसातील अंतर्गत वादातून या शस्त्रांचा वापर करण्यासाठी त्यांची वाहतूक करीत असल्याचे समोर आले. - सराईत गुन्हेगार ताब्यात घेतलेल्या संशयितांपैकी भूषण गवळे हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याविरुद्ध नरडाणा (ता. शिंदखेडा) पोलिस ठाण्यात हत्येचा, सारंगखेडा (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथे दरोड्याचा तसेच अहमदाबाद (गुजरात) येथे एनडीपीएस आणि सुरत येथे आर्म्स अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी दोंडाईचा पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, सहायक निरीक्षक दीपक ढोके, अमरजित मोरे, प्रशांत चौधरी, चेतन बोरसे, संतोष हिरे, कमलेश सूर्यवंशी, विनायक खैरनार, हर्शल चौधरी, राहुल गिरी, जगदीश सूर्यवंशी, अमोल पाटील, सिद्धार्थ निकम यांच्या पथकाने ही कारवाई केली. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com