देवळाली, ओढा येेथे गर्दी नियोजनाला प्राधान्य

देवळाली, ओढा येेथे गर्दी नियोजनाला प्राधान्य
Published on
ओढा, देवळाली स्थानकांवर कुंभमेळ्याची गर्दी नियोजनाची पाहणी भाविकांसाठी स्वतंत्र वाहतूक मार्ग; होल्डिंग एरिया व ग्रीन कॉरिडॉरचीही आखणी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २१ : आगामी सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने नाशिकमध्ये दाखल होणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे नियोजन आणि सुरक्षित वाहतुकीसाठी ओढा व देवळाली रेल्वेस्थानकांची सोमवारी (ता. २१) संयुक्त पाहणी करण्यात आली. स्थानकांवरील गर्दी नियंत्रण, भाविकांची सुरक्षित हालचाल आणि शटल बससेवेसाठी स्वतंत्र वाहतूक मार्ग याबाबत यावेळी आढावा घेण्यात आला. नाशिकच्या उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे, रेल्वेच्या भुसावळ विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, किशोर काळे यांच्यासह सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण, नाशिक तालुका मास ट्रान्स्पोर्ट अथॉरिटी आणि पोलिस प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. कुंभमेळ्यातील प्रमुख पर्वणीच्या काळात मोठ्या संख्येने भाविक रेल्वेने नाशिकमध्ये येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर ओढा व देवळाली स्थानकांवरून भाविकांना साधुग्राम आणि रामकुंड परिसरात नेण्यासाठी शटल बससेवा उपलब्ध करून देताना स्वतंत्र व सुलभ मार्ग ठेवण्याबाबत चर्चा झाली. स्थानक परिसरात वाहनांची कोंडी होऊ नये आणि भाविकांची सुरक्षित वाहतूक व्हावी, यासाठी रेल्वे, पोलिस, वाहतूक यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनामध्ये समन्वय राखण्यावर भर देण्यात आला. ग्रीन कॉरिडॉरसाठी जागांची पाहणी गर्दी वाढल्यास तात्पुरते होल्डिंग एरिया, तसेच भाविकांच्या प्रवेश व निर्गमनासाठी स्वतंत्र मार्ग निश्चित करण्याच्या दृष्टीने जागांची पाहणी करण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, अग्निशमन दल किंवा अन्य मदत यंत्रणांना तातडीने मार्ग उपलब्ध व्हावा, यासाठी ग्रीन कॉरिडॉर निश्चित करण्याबाबतही आढावा घेण्यात आला. कुंभमेळ्याच्या काळात गर्दी नियंत्रण आणि वाहतूक व्यवस्थापन प्रभावी करण्यासाठी या उपाययोजनांना अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. फोटो क्रमांक :- एच-30269

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com