पान-२
-----------------
फोटो आहे
त्र्यंबकेश्वर ः सिंहस्थांतर्गत सुरु असलेल्या कामांची पाहणी करताना कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखरसिंह, शेजारी नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, नगरसेवक प्रशांत गायधनी, सत्यप्रिय शुक्ल व नगरसेविका, नगरसेवक.
---------------------
ध्वजारोहणापूर्वी सिंहस्थाची कामे पूर्ण करा
-------------
शेखरसिंह यांचे निर्देश ः कुशावर्त तिर्थ कामांमुळे स्नानासाठी बंद राहणार
-------------
सकाळ वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर, ता.२१ ः त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरासह सिंहस्थाची सुरू असलेली विविध कामे ध्वजारोहणापूर्वी पूर्ण करावेत अशा सूचना प्राधिकरणाचे आयुक्त शेखरसिंह यांनी सोमवारी येथे संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान मंदिरा आवारातील तसेच इतर ठिकाणी सुरु असलेल्या जुन्या दगडांच्या जागी नवीन दगडच बसविण्यात येतील असे पुरातत्व विभागाने स्पष्ट केले.
-------------
कुंभमेळा प्राधिकरण तसेच पुरातत्व खात्याने सुरु केलेल्या कामांची नगरसेवक व शेखर सिंह यांनी केली पाहणी. कुशावर्त तीर्थावर स्नानासाठी काही काळ बंद ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या सभागृहात सकाळी झालेल्या बैठकीस सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, पुरोहित संघ, देवस्थान यांच्या संयुक्त बैठकीत कुंभमेळा प्राधिकरणाचे प्रमुख शेखर सिंह यांनी चर्चा करून होणारी कामे व त्यांची प्रगती याबाबतची माहिती विचारली व सूचना केल्या. ध्वजारोहणाच्या कामाचीही चर्चा करण्यात आली.
त्र्यंबकेश्वर मंदिरासमोरील बगीचा व तेथील ध्वज हलवून जागा मोकळी कशी करता येईल याची सगळ्यांनी पहाणी करून मंदिराच्या प्रांगणात सुरू असलेल्या फरसबंदीच्या कामाचा आढावा घेतला. नगरसेवक प्रशांत गायधनी व विश्वस्त सत्यप्रिय शुक्ल यांनी जुने दगड घडवून परत लावावे असे सुचविले, यावर शेखरसिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगतो असे स्पष्ट केले. कुशावर्त तीर्थावर मध्यभागी उभारलेले लोखंडी पिलर व बॅरिकेटींग काढण्यात यावे, त्याऐवजी पात्रांना समांतर अशी भक्कम आडवी जाळी लावावी, जेणेकरून स्नानासाठी येणाऱ्यांना मुबलक जागा उपलब्ध होऊन बुडण्याच्या धोका टळेल.
गंगा गोदावरी मंदिराच्या मागील बाजूस (दशक्रिया) होणाऱ्या भागात फरसबंदीचे जुने दगड काढून नवीन लावण्यात येणार आहेत त्याऐवजी तेच दगड घडवून लावावे असे प्रशांत गायधनी, सत्यप्रिय शुक्ल यांनी शेखरसिंह यांना सांगितले. त्यावर पुरातत्व खात्याचे सहाय्यक संचालक अमोल गोटे यांनी जुन्या दगडांचा वापर होऊ शकत नाही. त्याऐवजी नविन बेसाल्ट दगडांचा वापर केला जात आहे असे स्पष्ट केले.
आॅक्टोंबरमध्ये होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमापूर्वी येथील कामे पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावर असून ते न झाल्यास अडचणी उभ्या राहतील असे शेखरसिंह यांनी स्पष्ट केले. नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, उपनगराध्यक्षा लोहगावकर, पाणीपुरवठा सभापती आरती लोखंडे, लहांगे, नगरसेवक सनी उगले यासह इतर नगरसेवक, सेविका, पालिका मुख्याधिकारी जाधव, देवस्थानचे अधिकारी समीर वैद्य, अमित माचवे यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते. त्यांनी कामांबाबत चर्चा केली. कामे त्वरेने करावयाची असल्याने कुशावर्त तीर्थावर स्नानासाठी काहीकाळ बंद ठेवण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले.
-------------------