ॲंकर
NSK26H30306
जळगाव : गणेशोत्सवातून पोस्टल योजनांची माहिती नागरिकांपर्यंत देताना अधिकारी.
---
गणेशोत्सवातून लोकसंवाद; योजनांची माहिती नागरिकांपर्यंत
जळगावात गणेश फेस्टिवल पोस्टल नाइट कॅम्पला गणेशभक्तांचा प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २२ : गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधत विविध शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उपक्रमांतर्गत आझाद क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, बळीराम पेठ येथे गणेश फेस्टिवल पोस्टल नाइट कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला गणेशभक्त व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आझाद क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे उभारण्यात आलेल्या अंटार्क्टिका खंडावरील महत्त्वपूर्ण मोहिमेचा एक भाग असलेल्या ‘ऑपरेशन गंगोत्री’ या आरास परिसरात कॅम्पचे आयोजन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून ‘लोकसंवाद’ साधत पोस्ट विभागाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता.
कॅम्पच्या उद्घाटनप्रसंगी आझाद क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष आश्विन भोळे, पदाधिकारी राहुल घोरपडे, रुपेश पाटील, विपीन पवार, मयूर विरपनकर, नितीन चंदनकर, कमलाकर फडणीस, प्रसाद जोशी आदी उपस्थित होते.
पोस्ट विभागामार्फत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असलेल्या विविध पोस्टल योजनांची माहिती पोस्ट विभागाच्या कर्मचाऱ्यांतर्फे नागरिकांना देण्यात आली. योजनांचे महत्त्व समजावून सांगण्याबरोबरच माहितीपत्रकांचे वितरण करण्यात आले.
चौकट
टपाल विभागाचे सहकार्य
गणेश फेस्टिवलच्या निमित्ताने शहरातील विविध गणेश मंडळांच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या पोस्टल नाइट कॅम्पच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधून पोस्ट विभागाच्या योजनांची माहिती पोहोचविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्य टपाल कार्यालयाचे एस. व्ही. मुंढे, वैभव तायडे, ग्यानोद्दिन तडवी यांनी सहकार्य केले.
------