धुळे : टुडे पान २ साठी...मेन
--
फोटो क्रमांक : 30313
धुळे : मराठा सेवा संघातर्फे राज्यस्तरीय वधू-वर परिचर मेळाव्याचे पोस्टर अनावरण करताना राजवर्धन कदमबांडे. शेजारी संजय देसले, हर्षवर्धन दहिते, जोत्स्ना पाटील, पी. एन. पाटील, संदीप पाटील, राहुल पाटील, डी. जी. मराठे, प्रफुल्ल पाटील, श्यामकांत बोरसे, जितेंद्र सोनवणे, सुमित बोरसे, डॉ. योगेश ठाकरे आदी.
--
‘रेशीमगाठी’ सूची समाजासाठी विश्वासाचा ठेवा
--
राजवर्धन कदमबांडे : मराठा सेवा संघातर्फे राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्याची सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २२ : मराठा सेवा संघाची रेशीमगाठी मराठा अनुरूप ही वधू-वर सूची समाजासाठी एक महत्त्वाचा ठेवा आणि विश्वासाचा दुवा ठरली आहे, असे गौरवोद्गार काढत माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी काढले. मराठा सेवा संघ संचलित वधू-वर सूचक व सामुदायिक विवाह कक्षामार्फत डिसेंबर २०२६ मध्ये धुळ्यात होणाऱ्या नियोजित राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याच्या नावनोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ केला. याप्रसंगी श्री. कदमबांडे बोलत होते. देवपूरातील गरुड कॉलनीस्थित मराठा सेवा संघाच्याकार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी बेचाळीस जणांनी नावनोंदणी करत या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
-
वधू- वर कक्ष प्रांताध्यक्ष पी. एन. पाटील अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार कदमबांडे, बांधकाम उद्योजक संजय देसले, जिल्हा परिषदेचे माजी सभापती हर्षवर्धन दहिते, उपमहापौर जोत्स्ना पाटील, कार्यकारी अभियंता राहुल पाटील, विजयकुमार ढोबळे, सुरेश पाटील, डी. जी. मराठे, प्रफुल्ल पाटील, वंदेमातरम प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्यामकांत बोरसे, सचिव जितेंद्र सोनवणे, सुमित बोरसे, सचिन बोरसे, उद्योजक प्रमोद पाटील, डॉ. योगेश ठाकरे, डॉ. संदीप पाटील, डॉ. राजेश पवार, संदीप पाटील, समिर पाटील, चंद्रकांत भामरे, निलेश साळुखे, साहेबराव देसाई, डॉ. संजय पाटील, प्रा. डॉ. के. बी. पाटील, डॉ. स्मिता ठाकरे, जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्ष मनीषा पवार, आरती पवार, मानसी भदाणे आदी उपस्थित होते.
-
जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांनी सेवा संघाची वाटचाल, वधू- वर परिचय मेळाव्याचे महत्त्व आणि विविध उपक्रमांची माहिती दिली. उद्योजक कक्षाचे समन्वयक अनंत पाटील, श्री. ढोबळे, गुलाबराव देवरे, रंगराव पाटील, एस. एम. पाटील, आर. आर. पाटील, नितीन पाटील, डी. टी. पाटील, संजय पाटील, अनिल राऊत, राजेंद्र पवार, ए. पी. खैरनार, एच. ओ. पाटील आणि तालुकाध्यक्ष अविनाश पवार यांच्या हस्ते नावनोंदणी फॉर्मचे वितरण करून औपचारिक उद्घाटन करण्यात आले. शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बी. ए. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. वधू- वर जिल्हासचिव डी. एल. पाटील यांनी आभार मानले.
-
१४-१
..चौकट..
१४-१
अनाठायी खर्च कमी करा
श्री. कदमबांडे यांनी यंदाही समाजबांधवांनी अधिकाधिक नावनोंदणी करण्याचे आवाहन केले. पी. एन. पाटील यांनी कुटुंबात संवाद वाढवण्यावर भर देत, विवाहातील अवास्तव अपेक्षा कमी कराव्यात व आवश्यकतेस समुपदेशनाची मदत घेण्याचे आवाहन केले. उद्योजक देसले, डॉ. ठाकरे व श्याम बोरसे यांनी विवाहातील वाढता दिखावा आणि अनाठायी खर्चाबाबत खंत व्यक्त करत खर्च कमी करत साधेपणाने विवाह साजरे करण्याचे आवाहन केले. खानदेशसह नाशिक, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, गुजरात आणि मध्यप्रदेश येथे दीडशेहून अधिक नोंदणी प्रतिनिधी कार्यरत आहेत. पालकांनी तालुकानिहाय प्रतिनिधींशी किंवा धुळे येथील मुख्य कार्यालयाशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा, असे आवाहन कक्षाचे कार्याध्यक्ष विजयकुमार ढोबळे यांनी केले.